जीवित नदी उपक्रमामुळे नदीला जीवनदान : गणेश कलापुरे

आैेधः पोलीसनामा आॅनलाईन

निसर्गात वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे दिवसेंदिवस प्रदुषनामध्ये वाढ होत आहे. त्यात नद्या देखील सुटू शकल्या नाहीत .देशभरात नदी व नदी परिसरात वाढते प्रदुषण चिंता निर्माण करणारे ठरत आहे. मात्र आैंध येथे जीवित नदी हा उपक्रम राबवून नदी स्वच्धतेतून मानवी आयुष्य समृद्धीकडे नेण्याचे कार्य येथील नागरिक करत आहेत.

आैंध येथील गणेश कलापूरे,मृणाल वैध, वैशाली पाटकर, आरती म्हसकर,नेहा भडभडे,मेघना भंडारी,माधवी कोलते ही मंडळी नदीला नविन जीवन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

या उपक्रमा अंतर्गत जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती म्हणून पर्यावरण स्नेही वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण बचत गट महिला मंडळ व व्यवसायिक यांना दिले जाते. नदीच्या पाण्यात होणारे बदल,पक्षी व प्राणी यांच्या स्थलांतराची निरीक्षण पाण्यात असणाऱ्या ऑक्सिजनच्या पातळीची चाचणी, प्रशासकीय अधिकारी व स्थानिक नागरिक यांच्या मदतीने स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवले जात आहेत.
यापुर्वी औंधच्या मुळा नदी मध्ये 28 जातीचे मासे होते, ते आता नामशेष झाले आहेत. आता केवळ प्रदूषित पाण्यावर जगणारा चीलापी हा मासा आहे जो मूळचा आपल्या नदीतील नाही. येणाऱ्या पुढील कालावधीत हि मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार असून जास्ती-जास्त लोकांनी या उपक्रमात सहभागी होवून सहकार्य करावे असे आव्हान जीवित नदी उपक्रमाच्या सदस्यांनी केले आहे.