ट्विटरवरुन ‘एक्झिट’ घेण्याचा बिग बींचा निर्णय?

प्रत्यक्षात अभिनयाचे शहनशहा असलेले बिग बी सोशल मीडियावर देखील फॉलोअर्सचे शहनशहा आहेत.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या अमिताभ बच्चन यांनी ट्विटर वरुन काढता पाय घेण्याचा इशारा दिला आहे. असंख्य फॉलोअर्स आणि त्यांचे प्रेम मिळत असूनही त्यांनी हा निर्णय का घेतला हाच प्रश्न अनेकांच्या मनात असताना , खुद्द बिग बींनीच ट्विट करत या प्रश्नाचं उत्तर दिलं.

मी ट्विटरच्या या दुनियेतून काढता पाय घेतोय कारण, माझ्या फॉलोअर्सचा आकडा कमी झाल्याचे कळतेय, असे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात बिग बींना हे विनोदी अंगाने लिहिल्याचेही स्पष्ट केले. पण, त्यांनी ‘थँक्यू फॉर द राईड’ असे लिहित पुन्हा अनेकांच्याच भुवया उंचावल्या. ट्विटरच्या या अनोख्या दुनियेला त्यांनी समुद्राची उमपा देत या समुद्रात इतरही काही मासे म्हणजेच ट्विटर युजर्स आहेत, जे अनेकांनाच आवडतात असे लिहिले आहे .

<blockquote class=”twitter-tweet” data-lang=”en”><p lang=”en” dir=”ltr”>T 2599 – TWITTER ..!!!?? you reduced my number of followers .. !!??HAHAHAHAHAHAHA .. !! thats a joke .. time to get off from you .. thank you for the ride .. ??? .. there are many 'other' fish in the sea – and a lot more exciting !! <a href=”https://t.co/85c15pDif4″>pic.twitter.com/85c15pDif4</a></p>&mdash; Amitabh Bachchan (@SrBachchan) <a href=”https://twitter.com/SrBachchan/status/958763306075877377?ref_src=twsrc%5Etfw”>January 31, 2018</a></blockquote>
<script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

‘एएनआय’च्या वृत्तानुसार ट्विटरवर इतरही असे काही सेलिब्रिटी युजर आहेत ज्यांच्या फॉलोअर्सचा आकडा बिग बींच्या फॉलोअर्सच्या आकड्याहूनही जास्त आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानच्या ट्विटर अकाऊंटकडेच अनेकांच्या नजरा वळल्या आहेत. सर्वाधिक फॉलोअर्सच्या शर्यतीत शाहरुख अमिताभ बच्चन यांना मागे टाकतोय. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सध्याच्या घडीला ३,२९,४१,८३७ या आकड्यासह बी टाऊनमधील सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्यांच्या यादीत शाहरुखने बाजी मारली. तर, ३,२९,०२,३२० इतक्या फॉलोअर्ससह बिग बींचे नावसुद्धा या यादीत समाविष्ट आहे. पण, येत्या काळात शाहरुखच्या फॉलोअर्सचा वाढता आकडा आपल्या लोकप्रियतेवर परिणाम तर करणार नाही ना, याच चिंतेने बहुधा अमिताभ बच्चन यांनी या टिवटिवीकरण्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला असावा.