नौदलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; करंज’ पाणबुडीचे जलावतरण

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन

स्कॉर्पिन वर्गातील तिसऱ्या वर्गातील पाणबुडी आयएनएस करंजचे बुधवारी जलावतरण करण्यात आले. ‘मेक इंन इंडिया’अंतर्गत संपुर्ण भारतीय बनावटीची ही पाणबुडी आहे. शत्रूला लक्ष्य करणे आणि पाण्यात राहून गुप्त पद्धतीने माहिती गोळा करण्याची क्षमताही या पाणबुडीत आहे.

स्कॉर्पिन वर्गातील सहा पाणबुड्या निर्माण करण्याचे काम माझगाव गोदी येथे सुरू आहे. प्रकल्प ७५ अंतर्गत या पाणबुड्यांची बांधणी सुरू असून यापूर्वी ‘कलवरी’ आणि खांदेरी या पाणबुडीचे जलावतरण पार पडले होते. याच वर्गातील तिसरी पाणबुडी ‘करंज’चे बुधवारी मुंबईत जलावतरण करण्यात आले. या सोहळ्याला नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा हे उपस्थित होते.

अशी आहेत करंज पाणबुडीची वैशिष्ट्ये-
करंज पाणबुडी मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेली संपूर्ण भारतीय बनावटीची पाणबुडी आहे. अत्याधुनिक तंत्रजान, शत्रूंचा अचूक हेरुन त्यांना लक्ष्य करण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी कमी आवाजामुळे शत्रूंना चकवा देखील देऊ शकते. टॉर्पिडो, जहाजभेदी क्षेपणास्त्रे आदींनी सज्ज असलेली ही पाणबुडी पुढील वर्षी नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे. करंज पाणबुडीची लांबी ६७. ५ मीटर तर उंची १२.३ मीटर इतकी आहे. या पाणबुडीचे वजन १,५६५ टन इतके आहे. जास्तीत जास्त काळ पाण्याखाली राहता यावे यासाठी पाणबुडीत ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था आहे.