पण… शरदराव होता होता राहिलेले पंतप्रधान : नाना पाटेकर

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन

देशात भाजप विरोधात विरोधक आक्रमक होताना दिसत असून पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. या प्रश्नावर नाना पाटेकर म्हणाले की, शरद पवार यांनी राज्यासह देशातील अनेक महत्वाच्या पदांवर काम केले असून अनेक वेळा त्यांच्याबाबत पंतप्रधानपदाच्या नावाचीही चर्चा ऐकली आहे. मराठी माणूस पंतप्रधान झाल्यास आंनदच होईल. असे म्हणत देवेगौडा पंतप्रधान झाले, मात्र शरदराव होता होता राहिलेले पंतप्रधान अशी खंत नानांनी व्यक्त केली.

यावेळी नाना पाटेकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत अनेक सामाजिक तसेच राजकीय विषयांवर भूमिका मांडली.
काँग्रेसने काहीच केले नाही असे म्हणू नका. इतकी वर्षे देशात लोकशाही टिकली हे श्रेय काँग्रेसचेच आहे अशी भूमिका मांडत नानांनी भाजपला वर्धापन दिनीच टोला लगावला.