पुणे विमानतळावर १८ लाखांचे सोने पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे आंतरराष्ट्रीय विमानातळावर दुबईवरून येणाऱ्या प्रवाशाकडून तब्बल १८ लाख रुपये किमतीचे सोने पकडले आहे. हे सोने डोक्याच्या फॅन्सी क्लिप तसेच हेअर बॅंड्स मधून लपवून आणले होते. सीमा शुल्क पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मोहम्मद इरफान शेख (रा. सी-सेक्टर ,छिता कॅम्प ,ट्रॉम्बे ,मुंबई )असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दुबई ते पुणे स्पाईस जेट विमानातून इरफान आला होता. पुणे सीमा शुल्क पोलिसांना इरफान च्या हालचाली संशयास्पद वाटल्याने, त्याच्या सामानाची झडती घेतली असता सामानातील डोक्याच्या क्लिप्स तसेच केसाचे बँड्स आणि इतर बॉक्स फोडून पहिल्यानंतर त्यामध्ये सोने आढळून आले. या सामानातील वस्तूंमध्ये ५६६.७८ ग्राम सोने मिळून आले. या सोन्याची किंमत भारतीय मूल्यानुसार तब्बल १७५७०१८ लाख रुपये एवढी आहे.

पोलिसांनी इरफानला सोने तस्करी करून सीमा शुल्क न भरल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.