पुण्यातील आयपीएल सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार?- उच्च न्यायालय

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन

मुंबई हायकोर्टाने मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणा-या आयपीएल सामन्यांसाठी पाणी  कुठून आणणार? असा सवाल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला विचारला आहे. यावर बुधवारी होणा-या पुढील सुनावणीत एमसीएला उत्तर मागितले आहे.

पुण्यातील गहुंजे स्टेडियमला चेन्नईत रद्द झालेले सामने हलवण्याचा निर्णय आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने घेतला आहे. तामिळानाडूत कावेरी पाणी वाटपावरुन वाद पेटलेला आहे. चेन्नई सुपरकिंग्स आणि कलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात याचे पडसाद उमटले होते. त्यामुळे  चेन्नई सुपरकिंग्सचे घरच्या मैदानातील सर्व सामने अचानकपणे रद्द करण्यात आले.

महाराष्ट्रात होणा-या आयपीएल सामन्यांसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याला विरोध करत लोकसत्ता मूव्हमेंट या सेवाभावी संस्थेने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करतांना मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र असोसिएशला बुधवारी आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.
दरम्यान, आयीएल गव्हर्निंग काऊंसिलने सीएसकेचे पुण्यातील सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.  होम ग्राऊंडवर एकूण सात सामने होणार होते, मात्र आता सुरक्षेच्या कारणामुळे हे सामने पुण्यात खेळवण्यात येतील. दरम्यान, सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे हे यापूर्वीही होम ग्राऊंड होते. पुणे सुपरजाएंट्सचा कर्णधार म्हणून तो या मैदानावर खेळलेला आहे.
चेन्नईचे पुण्यातील सामने
20 एप्रिल, चेन्नई सुपरकिंग्ज वि. राजस्थान रॉयल्स
28 एप्रिल, चेन्नई सुपरकिंग्ज वि. मुंबई इंडियन्स
30 एप्रिल, चेन्नई सुपरकिंग्ज वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स
5 मे, चेन्नई सुपरकिंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
13 मे, चेन्नई सुपरकिंग्ज वि. सनरायझर्स हैदराबाद
20 मे, चेन्नई सुपरकिंग्ज वि. किंग्ज इलेव्हन पंजाब
आता पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर या आयपीएलमधले एकूण आठ सामने होतील. सीएसकेचे सहा आणि यापूर्वीच ठरलेला पहिला एलिमिनेटर आणि पहिला क्वालिफायर पुण्यात खेळवण्यात येईल, जो 23 आणि 25 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.