पॉवरफुल राजकारणी धनंजय मुंडेंचा जन्मभुमी परळी नगरीत भव्य नागरी सत्कार सोहळा

परळी: पोलीसनामा आॅनलाइन

संपुर्ण राज्याने कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वाच्या गुणांमुळे पॉवरफुल राजकारणी म्हणुन गौरविलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा उद्या शुक्रवार दि.20 एप्रिल रोजी त्यांची जन्मभुमी, कर्मभुमी असलेल्या परळी वैजनाथ नगरीत भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आपल्या लाडक्या नेत्याचा गौरव करण्यासाठी संपुर्ण परळी नगरी सज्ज झाली आहे.

वयाच्या आठराव्या वर्षापासुन सक्रिय राजकारणात असलेल्या धनंजय मुंडे यांनी मागील साडेतीन वर्षात विरोधी पक्षनेता म्हणुन काम करतांना पॉवरफुल राजकारणी म्हणुन आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कतृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वाच्या गुणांमुळे संपुर्ण राज्यात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. एक सक्षम विरोधी पक्षनेते म्हणुन शेतकरी, सर्व सामान्य नागरीक आणि सर्व स्तरातील समाज घटकांचे प्रश्न सभागृहात असो की, सभागृहा बाहेर अतिशय प्रभावीपणे मांडुन त्यांनी राज्याच्या राजकारणावर छाप पाडली आहे. त्यांच्या याच कतृत्वाची दखल घेत लोकमत या मराठीतील राज्यातील अग्रगन्य दैनिकाने नुकताच त्यांचा महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर 2018 हा पुरस्कार देऊन गौरव केला. राज्य भरात आपल्या नेतृत्वाचे कौतुक होत असतांना जन्मभुमी, कर्मभुमीतही त्यांचा असाच गौरव व्हावा यासाठी परळीतील सर्वपक्षीय, विविध संघटनांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्याचे निश्चित करण्यात आले  आहे.

शुक्रवारी 20 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातील मोंढा मैदानावर होणार्‍या जाहिर कार्यक्रमात या नेत्याचा गौरव करण्यात येणार असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा काँग्रेसच्या नेत्या रजनी पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी राज्यमंत्री प्रकाशदादा सोळंके, विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित, आमदार मधुसुदन केंद्रे, आमदार सतिष चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार रामराव वडकुते, माजी आमदार उषा दराडे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सचिन मुळुक, युवा रिपाईचे प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे, मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, युवक नेते संदिप क्षिरसागर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब आजबे उपस्थित राहणार आहेत. या शिवाय परळीच्या नगराध्यक्षा सरोजनीताई हालगे, पंचायत समितीचे सभापती कल्पना मोहन सोळंके, मार्केट कमिटीचे सभापती सुर्यभान नाना मुंडे, अंबाजोगाईच्या पंचायत समितीच्या सभापती मिनाताई शिवहार भताने, शिव संग्रामचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार हे ही उपस्थित राहणार आहेत.

या सत्कार सोहळ्याची परळी शहरात संयोजन समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असुन, संपुर्ण शहर मुंडे यांच्या स्वागताचे बॅनरने सजले आहे. मोंढा मैदानावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. नागरी सत्कार समितीच्या सोबतच शहरातील विविध संघटनांच्या वतीनेही मुंडे यांचा ही या सोहळ्यात  गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास शहरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.