बॉक्स आॅफिसवर ‘हिचकी’ची रेकॉर्डब्रेक कमाई

अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर आठ दिवसांत २८ कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला आहे. २३ मार्च रोजी प्रदर्शित झालेला अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच पसंत येत आहे. चित्रपटात एका शिक्षिकेची भूमिका साकारली आहे .

दरम्यान, पहिल्याच दिवशी ‘हिचकी’ने केवळ ३.३० कोटी रूपयांची कमाई केली. त्यानंतर शनिवारपासून ५.३५ कोटी चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर आपली पकड मजबूत केली. रविवारी चित्रपटाने ६.७० कोटी, सोमवारी २.४० कोटी, मंगळवारी २.३५ कोटींची कमाई केली.
आतापर्यंत चित्रपटाने २८.५० कोटींची कमाई केली. दरम्यान, ‘हिचकी’ हा चित्रपट केवळ ९८६ स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता.

पाच दिवसांत चित्रपटाने निर्मितीचा खर्च वसूल केला. यशराज बॅनरचा हा चित्रपट २० कोटी रूपयांमध्ये बनविला आहे. चित्रपटात राणी मुखर्जी व्यतिरिक्त एकही बडा स्टार नाही. अशातही जबरदस्त अभिनय आणि कथेच्या जोरावर चित्रपटाने प्रेक्षकांना आपलेसे केले. राणी २०१४ मध्ये आलेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटात एका दबंग पोलीस अधिकाऱ्यच्या भूमिकेत बघावयास मिळाली होती. तब्ब्ल चार वर्षांनंतर राणीने पडद्यावर दमदार कमबॅक केले.