महापुरूषांच्या विटंबनेचे सत्र थांबेना, श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नामफलकाला फासले काळे

कोलकाता : महापुरूषांच्या पुतळा विटंबनेच्या घटना ताज्या असताना प्रेसिडेन्सी विद्यापीठाच्या आवारात विटंबनेची घटना समोर आली आहे. विद्यापीठाच्या आवारात असलेल्या भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नामफलकाला अज्ञातांनी काळे फासले.

त्रिपूरा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरात महापुरूषांच्या पुतळा विटंबनेचे सत्र सुरू आहे. लेनिन ,सावरकर,आंबेडकर,श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यांच्या विटंबनेच्या घटना विविध राज्यात अज्ञात समाजकंटकांनी घडवल्या आहेत. त्यानंतर यातील काही दोषींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.