रविवारी पुणे ते लोणावळा दरम्यान मेगा ब्लॉकमुळे सिहंगड, प्रगती सह काही लोकल रद्द

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

पुणे ते लोणावळा दरम्यान येत्या रविवारी (दि. ११ ) मध्य रेल्वेच्या वतीने मेगा ब्लॉक ठेवण्यात आला असून या दिवशी पुणे- मुंबई सिहंगड एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस या गाड्यांसह पुणे लोणावळा दरम्यान धावणा-या काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ही माहिती मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आली आहे.

रद्द करण्यात आलेल्या पुणे लोणावळा लोकलच्या वेळा
सकाळी 5.51, 6.13 (सिंहगड) 6.36, 6.56(तळेगाव), 7.50 (प्रगती एक्सप्रेस), 9.03 (तळेगाव), 10.01, 11.20, 11.26, दुपारी 12.21, 13.06, 15.06, 15.46
रद्द करण्यात आलेल्या लोणावळ्याहून पुण्याकडे येणा-या लोकलच्या वेळा
सकाळी 7.41, 8.30 (तळेगाव), 9.31, 10.40 (तळेगाव), 11.20, दुपारी 12.41, 15.11, 16.01, 16.51, 17.35 (कर्जत), 17.20 (तळेगाव), सायंकाळी 18.15 (सिंहगड एक्सप्रेस), 19.39 (प्रगती एक्सप्रेस)