राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी अपराधसिद्धी पुरस्काराने सन्मानित

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

आॅगस्ट 2016 ते एप्रिल 2017 या कालावधीमध्ये घडलेले गुन्हे यापैकी पंधरा गुन्ह्यामधील एकुण 80 अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार आज देण्यात आला. हे सर्व पुरस्कार अपर पोलीस महासंचालक संजयकुमार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. चेन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस संघाने एकूण तीन राैप्य व तीन कांस्य पदके पटकावली. या पदक विजेत्या खेळाडूसह गुन्हे अन्वेषण विभागात अंतर्गत घेण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धांमधील विजत्या संघाना गाैरविण्यात आले.

यावेळी राज्यभरातील विविध विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सन्मानित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी अनेक प्रकारच्या गंभीर गुन्ह्याचा शोध काैशल्यपूर्वक लावला आहे. यापैकी मुंबई पोलीसांनी तपास केलेले प्रिती राठी अॅसिड हल्ला प्रकरण याचबरोबर बीडकीन पोलीस ठाणे आैरंगाबाद ग्रामीण येथील गुन्ह्यामध्ये अकरा आरोपींनी मोक्का अंतर्गत शिक्षा झाल्याचा गुन्हा, तसेच सीआडीने तपास केलेल्या वेंगुर्ला पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या दुहेरी खुन खटला अशा महत्वाच्या व गंभीर गुन्ह्याचा अपराधसिद्धी पुरस्कारामध्ये समावेश आहे.

पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी यांना सततच्या कामामुळे अनेक प्रकारच्या ताणतणावाचा सामना करावा लागतो. या तणावातून मुक्तता मिळावी व त्यांच्यात एक नवी प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील विविध प्रकारच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिडा स्पर्धामध्ये विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

गुन्ह्याचा तपास करुन शोध लावणे हे कोणा एका कर्मचाऱ्यांचे काम नाही तर यासाठी राज्य भरातील विविध भागातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य आवश्यक असते. न्यायालयात केस चालवणे ही एक कला असते, गुन्हा दाखल करण्यापासू केल उभी करण्यापर्यंत हे एक सांघिक कार्य आहे. असे मत अपर पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी व्यक्त केले. हा पुरस्कार सोहळा 2009 पासून सुरू करण्यात आला असून. पोलीस दालातील कर्मचाऱ्यांमध्ये एक नवी प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे ही ते यावेळी बोलताना म्हणाले.

या कार्यक्रमाला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल रामानंद, पोलीस उपमहानिरीक्षक डाॅ. जय जाधव, पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर तसेच गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.