राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 4 टक्के वाढीव महागाई भत्ता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य सरकारी कर्मजा-यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4 टक्के वाढीव भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेताल आहे. एक ते दोन दिवसांत तो जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. ही वाढ 1 जुलै 2017 पासून लागू होणार असून 19 लाख कार्यरत आणि निवृत्त अधिकारी-कर्मचा-यांना याचा लाभ मिळणार आहे. परंतु 1 जानेवारी 2017 च्या महागाई भत्त्याची थकबाकी कधी मिळार याबाबत अनिश्चितता आहे.
सध्या राज्य सरकारी कर्मचा-यांना 136 टक्के महागाई भत्ता मिळत असून नव्याने 4 टक्के वाढ केल्यामुळे आता 140 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

केंद्रा प्रमाणे राज्य सरकार वर्षातून दोनदा महागाई निर्देशांकानुसार भत्त्यामध्ये वाढ किवा घट करते. वर्षातील1 जानेवारी आणि 1 जुलै या दोन तारखांना महागाई भत्त्यात वाढ केली जाते. या वाढीमुळे दरमहा राज्याच्या तिजोरीवर 100 कोटींचा बोडा पडतो. या निर्णयावर मुख्य सचिवांनी शिक्कामोर्तब केले असून, अर्थमंत्र्यांनीही त्यास संमती दिली आहे. फक्त मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होणे बाकी आहे. मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होताच एक ते दोन दिवसांत हा निर्णय जाहीर होईल.

जुलै, २०१७ पासूनच्या महागाई भत्त्याची वाढ ही चालू महिन्यात जाहीर होणार असल्यामुळे मागील आठ महिन्यांचीही थकबाकी द्यावी लागणार आहे. ही थकबाकीच सुमारे दोन हजार कोटी रु.ची होणार आहे. सध्या राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता ही थकबाकी देणे हे सरकारसमोर मोठेच आव्हान ठरणार आहे.