राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारला सुवर्णपदक

सिडनी: राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुशील कुमारनेही फ्री-स्टाइल कुस्तीमध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी केली आहे. सुशील कुमारने 74 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्स बोथाचा पराभव केला.

सुशीलने अवघ्या 80 सेकंदात डाव जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्स बोथावर 10-0 ने मात करत सुशीलकुमारने अवघ्या 80 सेकंदांत पदक खिशात घातले. त्याने जिंकलेल्या पदकामुळे भारताच्या खात्यामध्ये एकूण १४ सुवर्ण पदके जमा झाली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताने आतापर्यंत ४ पदके पटकावली आहेत.