व्यवस्थेचे बळी…

पोलीसनामा आॅनलाईन:

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सतत काही ना काही अघटित असे घडत आहे. कुठे फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकरी मरतो आहे…. तर कोणी रेल्वे पुलाच्या चेंगरचेंगरी खाली जातोय…. अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे कोणी ख्यातनाम डॉक्टर ड्रेनेज मध्ये अडकून मरतोय ….कधी मंजुळा शेट्ये तर कधी अनिकेत कोथळे सरकारी अनास्थेचे बळी ठरतात ..इमारत कोसळून अनेक जीव दबले जातात …नुकतेच झालेले अग्नी तांडव कमला मिल व भानु फरसाण अशा अनेक घटना काही लगतच्या दिवसांमध्ये सातत्याने घडतांना दिसत आहे.

हे सर्व घटना घडत आहे पण आपली प्रशासन व्यवस्था मात्र अजूनही निद्रिस्त अवस्थेत आहे. या जगात कोणीही किरकोळ नसतो. प्रत्येक जण हा व्यैयक्तिक आयुष्यात कोणासाठी तरी एक आधार असतोच किंवा महत्वाचा असतो. एक गेला/दोन-चार गेलेत तर आपण ह्या घटना किरकोळ समजतो. किरकोळ संख्या असली म्हणजे इतना तो चलता है… ये तो होता है…. याप्रकारे काना डोळा करून विषय संपवला जातो . ही वृत्ती सोडून व्यवस्थेने याचे गांभीर्य ओळखले पाहिजे.

काल परवा झालेल्या मुंबईतील आगीच्या दुर्घटनेमध्ये सुरक्षा नियमांची बेपरवाई समोर आलीच. जबाबदारीचा असा चालढकलपणा हा पुढील अनेकांच्या मृत्यूचे कारण ठरतो. अशा प्रकरणात गरीबांचे नाहक बळी जात असतात. मध्यंतरी एक व्हिडियो माकड झाडाला बांधून त्याला अमानुषपणे मारहाण करतांनाचा प्रसारीत झाला होता. जर प्रशासनाला माणसांची किंमत नसेल तर माणसे सुद्धा प्रशासनासारखे वागुण जनावरांवर अत्याचार करतांना दिसतीलच. सांगलीतील अनिकेत कोथळे प्रकरण ह्याच प्रकारात मोडणारे ठरेल. मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मृत्यू किती स्वस्त झाला आहे हे अलीकडच्या घटनांवरून समजते. आपण सुजलाम सुफलाम महाराष्ट्र बद्दल नेहमी ऐकतो. पण ज्यांच्या कुटुंबावर ही शोककळा पसरली आहे त्यांचे काय….? आता पर्यंतच्या घटनांवरून काही तरी धडा घेऊन मायबाप सरकारने कारवाही आणि कार्यवाही याबाबत कठोर पाऊले उचलली पाहिजेत . वैयक्तिक हितसंबंध हे बाजूला ठेऊन आपण समाजासाठी , समाजाच्या सेवेसाठी सत्तेमध्ये आलो आहोत, हे भान राहिल्यास हाती असलेली व्यवस्था ही नक्कीच सुरळीत होईल. “रोज मरे त्याला कोण रडे’ अशी सरकारी यंत्रनेची स्थिती झाली आहे. मग कालचे ८४ वर्षीय धर्मा पाटील हे सुद्धा याच सरकारी अनास्थेचे बळी ठरले आहेत. सर्वसामान्य माणूस असाही दररोज धडपडत जीवन जगतच आहे, त्यांची दुःखे,गरीबी,बेकारी दूर करणे सोडून सरकार सर्वसामांन्याची गरीबी, बेकारी ही त्यांना संपवून तर हटवत नाही ना याच उत्तर आता शोधावे लागेल…?

अमित येवले.
बी.ई.(इलेक्ट्रिकल)
एम.ए.(लोकप्रशासन)