सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार गेला चोरीला

मुंबई : वृत्तसंस्था
ऑस्कर पुरस्काराचे महत्व प्रत्येक कलाकाराला किती असते हे सर्वश्रुत आहे. नुकत्याच झालेल्या ९०व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणा-या फ्रेन्सिस मॅकडोरमेंड यांचा ऑस्कर पुरस्कार चोरीला गेला. परंतु काही वेळातच चोराला पकडून तो परत घेण्यात पोलिसांना यश आले.

चार मार्चला आयोजित झालेल्या ९०व्या अकॅडमी पुरस्कार सोहळ्यात फेन्सिस याना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पण पुरस्कार सोहळा संपल्यावर त्यांचा ऑस्कर चोरीला गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोधाशोध सुरु केली . आणि काही वेळातच चोर पकडला गेला त्यामुळे फ्रान्सिस यांचा जीव भांड्यात पडला.

यासंबंधी एका ४७ वर्षीय व्यक्तीला ऑस्कर चोरी प्रकरणी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला. अभिनेत्री फ्रेन्सिस यांना मिळालेला हा दुसरा ऑस्कर पुरस्कार आहे. या पूर्वी त्यांना १९९७ मध्ये ‘फारगो’ या सिनेमातील भूमिकेसाठी ऑस्कर मिळाला होता. यंदा फ्रेन्सिस यांना ‘थ्री बिलबोर्ड्स आऊटसाईड एबबिंग, मिसोरी’ साठी मिळाला आहे.