सलमान खानला फक्त ‘त्या’ चार देशात जाण्याची परवानगी

जोधपूर : वृत्तसंस्था
जोधपूर न्यायालयाने काळविट शिकार प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेता सलमान खानला दोषी ठरवल्यानंतर त्याने काही मोजक्या देशात जाण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती.

जोधपूर न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर दोन दिवस कारागृहात मुक्काम केला. त्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला. आता जोधपूर न्यायालयाने सलमानला काही ठराविक देशात जाण्यासाठी परवानगी दिली आहे.

परदेशात जाण्याबाबत सलमान खानने जोधपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या अर्जावर सुनावणी करताना सलमान खान कॅनडा, नेपाळ आणि अमेरिकेमध्ये 25 मे ते 10जुलै या दरम्यान जाणार आहे.