होय… क्षयरोग पूर्णत: बरा होवू शकतो : डॉ. पराग खटावकर

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

क्षयरोग हा संपूर्ण बरा होणारा असा आजार आहे. मात्र, त्यासाठी योग्यवेळी उपचार घेणे आवश्यक आहे. असे प्रसिध्द श्वसनरोग तज्ञ डॉ. पराग खटावकर यांनी सांगितले.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पोलिसनामाचे प्रतिनिधी अमित भिडे यांनी डॉ. खटावकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या आजाराविषयी तसेच उपलब्ध उपचारांविषयी माहिती दिली.

ते म्हणाले की, सर्वांनीच स्वतःचा खोकला चार आठवड्यांपेक्षा जास्त राहील्यास त्वरित योग्य तपासणी व औषधोपचार करून घ्यावेत. संपूर्ण बरा होणारा असा हा क्षयरोग आजार असला तरीही योग्य ती काळजी घेणे आवश्यकच आहे.