आजच्याच दिवशी झाला होता भारत मातेचे सुपूत्र भगत सिंह यांचा जन्म

पोलीसनामा ऑनलाइन – वर्षातील नवव्या महिन्याचा हा 27 वा दिवस इतिहासात भारत मातेचा सर्वात लाडका सुपूत्र आणि इंग्रजांच्या गुलामीतून मुक्ती देण्यासाठी 23 वर्षांच्या छोट्या वयात फासावर लटकलेले शहीद भगत सिंह यांचा जन्म दिवस म्हणून नोंदला गेला आहे.

27 सप्टेंबर 1907 ला अविभाज्य पंजाबच्या लायलपूर (आता पाकिस्तानमध्ये) मध्ये जन्मलेले भगत सिंह खुप कमी वयात स्वातंत्र्याच्या लढाईत उतरले. त्यांच्या लोकप्रीयतेने भयभीत झालेल्या ब्रिटीशांनी त्यांना 23 मार्च 1931 ला फासावर लटकवले.

मागच्या शतकाच्या अखेरच्या वर्षांमध्ये इंटरनेटच्या जगात एक मोठी घटना घडली, जी आज आपल्या सर्वांच्या जीवनाशी संबंधित आहे. 1998 मध्ये आजच्याच दिवशी पीएचडीच्या दोन विद्यार्थ्यांनी इंटरनेट सर्च इंजिन गुगलची स्थापना केली. आज हे जगातील सर्वात मोठे इंटरनेट प्लॅटफार्म आहे.

देश आणि जगाच्या इतिहासात 27 सप्टेंबर या तारखेचे महत्व सविस्तर जाणून घेवूयात…

1066 : नॉरमँडीच्या ड्यूक विलियमने आपल्या सैन्याला इंग्लंडच्या दक्षिण पूर्व किनार्‍याकडे त्या अभियानासाठी रवाना केले, ज्यास नंतर नॉरमन फतेह म्हणून ओळखले गेले.

1760 : मीर कासिमने मीर जाफरच्या ठिकाणी बंगालच्या नवाबाची गादी सांभाळली.

1781 : हैदर अली आणि ब्रिटिश सैन्यात सालनगढची प्रसिद्ध लढाई झाली.

1833 : राम मोहन राय यांचे इंग्लंडच्या ब्रिस्टलमध्ये निधन.

1907 : भारताचे महान क्रांतिकारक भगतसिंह यांचा जन्म.

1918 : ब्रिटिश सैन्याने पहिल्या महायुद्धादरम्यान वेस्टर्न फ्रंटवर अंतिम आक्रमणात हिंडनबर्ग लाइनवर हल्ला केला.

1964 : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्येचा तपास करणार्‍या वॉरेन आयोगाने आपला निष्कर्ष जारी केला.

1970 : जोर्डनच्या शाह आणि फलस्तीन मुक्ती संघटनेचा नेत्यामध्ये काहिरामध्ये एका समेलनात युद्धविरामावर सहमती.

1977 : प्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांचे निधन.

1988 : धावपटू बेन जॉन्सनला प्रतिबंधित पदार्थ सेवनामुळे सेऊल ऑलंपिक खेळातून काढले. त्याचे 100 मीटर धावण्यात जिंकलेले सुवर्ण पदक परत घेतले.

1995 : कलकत्ता मेट्रो स्टेशन टोलीगंज आणि दमदमच्या दरम्यान पूर्ण क्षमतेने संचलन सुरू.

1996 : मोहम्मद उमरच्या नेतृत्वात तालिबानने काबुलवर कब्जा केला आणि अफगाणिस्तानला इस्लामी राष्ट्र घोषित केले.

1998 : पीएचडी करणार्‍या दोन विद्यार्थ्यांनी सर्च इंजिन गुगरची स्थापना केली.

2008 : चीनचा अंतराळ प्रवासी झाई झीगांगने प्रथमच अंतराळात प्रवेश केला.