देशातील ‘या’ 3 मोठ्या बँकांचे होणार विलीनीकरण, तयार होणार दुसरी मोठी बँक

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने यूनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नेशनल बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकांचे विलीनीकरण करण्यासाठी 34 समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यूनियन बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या सर्व टीम विलीनीकरणाच्या प्रोसेसमध्ये येणारे अडथळे दूर करणार आहेत. प्रत्येक बँकेतून दोन सदस्यांना घेण्यात आले आहे जे की विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर लक्ष देऊन असतील. युनिअन बँक ऑफ इंडिया सध्या कलकत्ता, गुहाटी आणि पटना येथील ग्राहकांसोबत आहे आणि त्यांना विलीनीकरणाबाबत असलेल्या शंकांचे निरसन करत आहे.

यूबीआय च्या सीईओनी सांगितले की विलीनीकरणानंतरही तीनही बँक एकत्र होण्यासाठी 12 ते 14 महिने लागतील. तीनही बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच याबाबत एक बैठक केली होती.

एसबीआय नंतरची सर्वात मोठी बँक होणार तयार
हे विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर तयारी होणारी बँक ही भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बॅंकेनंतरची सर्वात मोठी बँक असेल. यूबीआयचा एकूण व्यापार 18 लाख कोटी रुपयांपर्यंत होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नुकतेच दहा बँकांचे विलीनीकरण करून चार नवीन बँक बनवण्याची घोषणा केली होती.

कशी असणार रँकिंग
विलीनीकरणानंतर बँकेचा एकूण कारभार 55.81 लाख कोटी रुपये होऊ शकतो. बँकांच्या विलीनीकरणानंतर यांच्या रँकिंगमध्ये देखील वाढ होणार आहे. बँकांच्या नव्या विलीनीकरणानंतर तयार होणाऱ्या बँकांचे नाव आणि रँकिंग काय असेल याची माहिती घेऊयात –

या बँकांचे होणार विलीनीकरण – पंजाब नेशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूनाइटेड बँक ऑफ इंडिया

नवीन नाव – पीएनबी
एकूण व्यवहार – 17.94 लाख कोटी रुपये
रँकिंग – दुसरी सगळ्यात मोठी बँक
या बँकांचे होणार विलीनीकरण – कॅनरा, सिंडिकेट बँक

नवीन नाव – कॅनरा
एकूण व्यवहार – 15.20 लाख कोटी रुपये
रँकिंग – चौथी मोठी बँक
या बँकांचे होणार विलीनीकरण – यूनियन बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक

नवीन नाव – यूनियन बँक ऑफ इंडिया
एकूण व्यवहार – 14.59 लाख कोटी रुपये
रँकिंग – पाचवी सर्वात मोठी बँक
या बँकांचे होणार विलीनीकरण – इंडियन बँक, इलाहाबाद बँक

नवीन नाव – इलाहाबाद बँक
एकूण व्यवहार – 8.08 लाख कोटी रुपये
रँकिंग – सातवी सर्वात मोठी बँक

Visit : Policenama.com