3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | तिसरी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा

कॉर्पोरेट विलोव्हर्स क्लब, राईज टू प्ले, रायझिंग बॉईज संघांचा दुहेरी विजय !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – 3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित तिसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament) कॉर्पोरेट विलोव्हर्स क्लब, राईज टू प्ले आणि रायझिंग बॉईज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयाचा दुहेरी धमाका केला.

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत बंटी रायकर याच्या नाबाद ८८ धावांच्या जोरावर राईज टू प्ले संघाने युनायटेड थंडरझ् संघाचा ३ गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना युनायटेड थंडरझ् संघाने १९१ धावांचे आव्हान उभे केले. शराफत अली शहा (नाबाद ५९ धावा) आणि पलाश कोंढारे (३३ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. हे आव्हान राईज टू प्ले संघाने १९.२ षटकात पूर्ण केले. बंदी रायकर याने ३७ चेंडूत ८ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८८ धावांची खेळी केली व संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

राकेश कुमार याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रायझिंग बॉईज संघाने टायटन बुल्स्चा ४ गडी राखून पराभव केला. टायटन बुल्स्ने प्रथम खेळताना १७४ धावा धावफलकावर लावल्या. अनुराग मोईत्रा (५९ धावा) आणि गिगी खोखर (५२ धावा) यांच्या खेळीमुळे संघाने समाधानकारक धावसंख्या उभी केली. राकेश कुमार याने ३६ धावात ५ गडी टिपत सुरेख गोलंदाजी केली. रायझिंग बॉईज संघाने १६ षटकात व ६ गडी गमावून हे आव्हान पूर्ण केले. अनिश गायकवाड (५४ धावा), चित्तरंजन रे (३९ धावा) आणि रोहन साळुंखे (३१ धावा) यांच्या फलंदाजीच्या योगदानामुळे संघाने विजय नोंदविला. (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament)

सुमित ठाकूरवार याच्या अष्टपैलू खेळीमुळे कॉर्पोरेट विलोव्हर्स क्लबने युनायटेड इलेव्हन संघाचा ४६ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
युनायटेड थंडरझ्ः २० षटकात ७ गडी बाद १९१ धावा (शराफत अली शहा नाबाद ५९ (२५, ३ चौकार, ६ षटकार), पलाश कोंढारे ३३, शुवरा बादुरी २९, रोहीदास पासलकर २-१७, राहूल लोखंडे २-३५) पराभूत वि. राईज टू प्लेः १९.२ षटकात ७ गडी बाद १९३ धावा (बंदी रायकर नाबाद ८८ (३७, ८ चौकार, ८ षटकार), तुषाश क्षीरसागर २५, निनाद फाटक २०, सिद्धार्थ रोमन ३-३८); सामनावीरः बंटी रायकर;

टायटन बुल्स्ः २० षटकात ७ गडी बाद १७४ धावा (अनुराग मोईत्रा ५९ (३४, २ चौकार, ५ षटकार), गिगी खोखर ५२
(४३, ४ चौकार, ३ षटकार), राकेश कुमार ५-३६, मुरारी झा २-३१) पराभूत वि. रायझिंग बॉईजः १६ षटकात ६ गडी बाद
१७७ धावा (अनिश गायकवाड ५४ (२५, ८ चौकार, २ षटकार), चित्तरंजन रे ३९, रोहन साळुंखे ३१, मोहम्मद काचवाला ३-३४);
सामनावीरः राकेश कुमार;

कॉर्पोरेट विलोव्हर्स क्लबः २० षटकात ७ गडी बाद १७७ धावा (सुमित ठाकूरवार ४७, नितीन चौहान ४५, दिपक पाटीदार २८,
रितेश साळी २-२४, नाना शिंदे २-३१) वि.वि. युनायटेड इलेव्हनः १६.३ षटकात १० गडी बाद १२९ धावा
(प्रतिक घाटे ३२, रितेश साळी २५, भावेश पाटील २०, उमेश सिंग ३-२६, सुमित ठाकूरवार २-०); सामनावीरः सुमित ठाकूरवार.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indian Economy Growth | पंतप्रधानांचे ‘हे’ मोठे स्वप्न होणार साकार; IMF ने देखील दिला दुजोरा; जपान- जर्मनीला टाकणार मागे