Indian Economy Growth | पंतप्रधानांचे ‘हे’ मोठे स्वप्न होणार साकार; IMF ने देखील दिला दुजोरा; जपान- जर्मनीला टाकणार मागे

पोलीसनामा ऑनलाइन – Indian Economy Growth | दिल्लीमध्ये पार पडलेल्या G20 च्या शिखऱ संमेलनाची (G20 summit) बैठक अनेक अर्थांनी भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली. विश्वातील 30 हून अधिक देशाच्या प्रमुख नेत्यांनी भारतीय संस्कृती आणि पाहुणचार अनुभवला. G20 च्या बैठकीवेळी भारताने मांडलेल्या प्रस्तावाला सर्व सदस्य देशांनी होकार देत पाठिंबा दिला. भारत देश हा दिवसेंदिवस अधिक समृद्ध व विकसित होत असल्याची बाब अनेकांनी मान्य केली आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जागतिक स्तरावर सर्वात वेगाने (Indian Economy Growth) वाढणारी अर्थव्यवस्था होत असून ही गोष्ट वर्ल्ड बॅंक (The World Bank) सह आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) अशा जागतिक संस्थांनी देखील मान्य केली आहे. भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेवर जागतिक संस्थांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि केलेल्या कौतुकामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे देशाबद्दलचे एक मोठे स्वप्न साकार होणार आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठे स्वप्न पाहिले आहे. येत्या 2047 पर्यंत देशाला जगातील प्रगत देशाच्या यादीमध्ये समाविष्ट करायचे आहे. तसेच येत्या 5 ते 6 वर्षांमध्ये जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था (World’s Third Largest Economy) म्हणून जगासमोर आणायचे आहे. त्यांच्या भाषणांमधून आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विचारांमधून हे स्वप्न सतत जाणवते. अनेकदा ते याचा उल्लेख भाषणामध्ये करत असतात. जागतिक संस्थांकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीवरुन हे स्वप्न साकार होणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या आपल्या देशाची अर्थव्यवस्था इतर देशापेक्षा वेगाने पुढे सरकत आहे. आणि जागतिक संस्था देखील भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मकता दाखवत आहेत.

दिल्लीमध्ये झालेल्या G-20 परिषदेच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या IMFच्या डिप्टी मॅनेजिंग डायरेक्टर भारतीय मूळ गीता गोपीनाथ (Gita Gopinath) यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक प्रतिपादन केले आहे. त्या म्हणाल्या की, “ग्लोबल ग्रोथ इंजिनच्या रुपात भारताची भूमिका नाकारली जाऊ शकत नाही. 2027-28 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते. पुढील काळात भारताचे ग्लोबल डेवलपमेंट महत्त्वाची भूमिका निभावेल, जागतिक विकासात भारताचे योगदान 15 टक्क्यांपर्यंत पोहचेल. परंतु हे ध्येय गाठण्यासाठी त्यांना लेबर मार्केटमध्ये सुधारणा, उद्योग करण्यासाठी सुलभता, शैक्षणिक गुणवत्ता, महिला सशक्तीकरण यावर विशेष जोर द्यावा लागेल.” असे देखील त्यांनी सुचवले आहे.

तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात जी आकडेवारी समोर येत आहे त्यावरुन त्यांच्या विश्वासार्हतेवर शंकेचे
कारण नाही. चालू आर्थिक वर्षात 6 टक्क्यांहून अधिक वाढीचा अंदाज असून वाढीचा उच्च स्तर राखण्यासाठी आणि
खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी संरचनात्मक सुधारणा आवश्यक आहे.
भारताच्या या प्रगतशील ध्येयाचे केवळ आयएमएफच नव्हे तर जगातील अनेक संस्था समाधानकारक व सकारात्मकता दर्शवत आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) या संस्थेने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत याआधीच अंदाज व्यक्त केला आहे.
त्यानुसार, भारत 2027 पर्यंत जपान (Japan) आणि जर्मनीसारख्या (Germany) देशांना मागे टाकेन आणि जगातील
सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या स्थानावर पोहचू शकते. 2014 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही 10 व्या स्थानावर होती.
आज भारताची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर (World’s Fifth Largest Economy) पोहोचली आहे.
कोरोना महामारीच्या काळात देखील भारतीय अर्थव्यवस्थेने उभारी (Indian Economy Growth) घेत वेग पकडला होता.
यावेळी इतर देशाच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या होत्या मात्र भारताने तेव्हा देखील उभारी घेतली होती.
अशाच पद्धतीने भारताची अर्थव्यवस्था कार्यरत राहिली तर लवकरच तिसऱ्या क्रमांकावर भारत येईल यामध्ये शंका नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | कार्बनीकरण कमी करण्याचा उद्योजक,तंत्रज्ञ,अभियंत्यांचा निर्धार

Bharati Vidyapeeth New Law College | भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या वतीने ‘ग्राहक संरक्षण कायदे’ विषयावर कार्यशाळा