3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | तिसरी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; सॅफरॉन क्रिकेट क्लब, रायझिंग स्टार्स संघ उपांत्य फेरीत !!

पुणे : 3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित तिसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत सॅफरॉन क्रिकेट क्लब आणि रायझिंग स्टार्स या संघांनी अनुक्रमे रायझिंग बॉईज आणि टायटन बुल्स् या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament)

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत हृषीकेश मत्स्ये याच्या शतकी खेळीच्या जोरावर सॅफरॉन क्रिकेट क्लबने रायझिंग बॉईज संघाचा ७ गडी राखून पराभव करून आगेकूच केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना रायझिंग बॉईजने १८५ धावांचे आव्हान उभे केले. देव डी. (५३ धावा), लखन परासे (४७ धावा) आणि आकाश नेगे (३३ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. हृषीकेश मत्स्ये याने ४३ चेंडूत १९ चौकार आणि २ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. यामुळे सॅफरॉन क्रिकेट क्लबने १५ षटकात व ३ गडी गमावून लक्ष्य सहज साध्य केले. शुभम खटाळे (४० धावा) आणि संकेत जोशी (२८ धावा) यांनीसुद्धा हृषीकेशला उत्तम साथ दिली.

श्रेयस शिंदे याच्या ९१ धावांच्या जोरावर रायझिंग स्टार्स संघाने टायटन बुल्स्चा ७ गडी राखून सहज पराभव केला.
प्रथम खेळताना टायटन बुल्स् संघाने १९२ धावा धावफलकावर लावल्या. गिगी खोखर (६५ धावा), आणि अनुराग मोईत्रा (५५ धावा) यांनी अर्धशतकी खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. रायझिंग स्टार्स संघाने हे लक्ष्य १६.२ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. श्रेयस शिंदे याने ९१ धावांची तर, कुंज सी. (४३ धावा) आणि हेमंत पाटील (नाबाद ३० धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाचा विजय साकारला. (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament)

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्यपुर्व फेरीः
रायझिंग बॉईजः २० षटकात ६ गडी बाद १८५ धावा (देव डी. ५३, लखन परासे ४७, आकाश नेगे ३३, कृष्णा भट ३-३७)
पराभूत वि. सॅफरॉन क्रिकेट क्लबः १५ षटकात ३ गडी बाद १९१ धावा (हृषीकेश मत्स्ये १०० (४३, १९ चौकार, २ षटकार),
शुभम खटाळे ४०, संकेत जोशी २८, शाम बिष्णोई २-४३); सामनावीरः हृषीकेश मत्स्ये;

टायटन बुल्स्ः २० षटकात ६ गडी बाद १९२ धावा (गिगी खोखर ६५ (४८, ६ चौकार, ४ षटकार), अनुराग मोईत्रा ५५,
अभिषेक श्रीवास्तव ३०, रविंद्र पाटील ३-२३, फर्श अन्सारी २-५३) पराभूत वि. रायझिंग स्टार्सः १६.२ षटकात ३ गडी बाद
१९४ धावा (श्रेयस शिंदे ९१ (३६, ८ चौकार, ८ षटकार), कुंज सी. ४३, हेमंत पाटील नाबाद ३०, आशिष कैरवडेकर २६,
अनुराग मोईत्रा १-२६); सामनावीरः श्रेयस शिंदे;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | होम ग्राऊंडवर नामुष्की! अजित पवारांच्या पोस्टरला फासले काळे

Pune Drug Case | ललित पाटील पलायन प्रकरण : ससून रुग्णालयाचे डीन मेहरबान असल्याचा पुरावा आला समोर