3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | तिसरी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा

स्पार्टन्स् क्रिकेट क्लब, युनायटेड इलेव्हन, कल्याण इलेव्हन संघांची विजयी कामगिरी !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित तिसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत स्पार्टन्स् क्रिकेट क्लब आणि युनायटेड इलेव्हन संघांनी पहिला विजय तर, कल्याण इलेव्हन संघाने सलग दुसरा विजय मिळवत स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवले. (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament)

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत किरण देशमुख याच्या नाबाद ७० धावांच्या खेळीमुळे स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने कॉर्पोरेट विलोवर्स इलेव्हनचा ७ गडी राखून पराभव करत स्पर्धेत गुणांचे खाते उघडले. पहिल्यांदा फलंदाजी करताना कॉर्पोरेट विलोवर्स इलेव्हनने १५० धावा धावफलकावर लावल्या. दिपक पाटीदार (४० धावा), रजत श्रीवास्तव (३७ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाच्या डावाला आकार दिला. हे आव्हान स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने १७.४ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. किरण देशमुख याने ३८ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७० केल्या. गौरव गोवांडे (३२ धावा) आणि प्रतिक लाव्हेकर (२१ धावा) यांनीही धावा जमवित संघाचा विजय साकार केला.

प्रतिक घाटे याच्या अर्धशतकी खेळीमुळे युनायटेड इलेव्हनने ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबचा ५ गडी राखून पराभव करून गुणांचे खाते उघडले. पहिल्यांदा फलंदाजी ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबने १६९ धावांचे आव्हान उभे केले. प्रतिक घाटे (५० धावा), हुसेन तांबोळी (३४ धावा) आणि अमित फाटक (नाबाद २६ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर युनायटेड इलेव्हनने सहज विजय मिळवला. चिराग शेरकर याच्या अष्टपैलू खेळीमुळे कल्याण इलेव्हनने राईज-टू-प्ले इलेव्हनचा २० धावांनी पराभव केला. (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament)

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
कॉर्पोरेट विलोवर्स इलेव्हनः २० षटकात १० गडी बाद १५० धावा (दिपक पाटीदार ४०, रजत श्रीवास्तव ३७, सौरभ सिंग २०,
विवेक कुबेर ३-३३, पार्थी नाईकर २-२५, रोहीत शिंदे ३-३१) पराभूत वि. स्पार्टन्स् क्रिकेट क्लबः १७.४ षटकात ३ गडी बाद १५६
धावा (किरण देशमुख नाबाद ७० (३८, ८ चौकार, ३ षटकार), गौरव गोवांडे ३२, प्रतिक लाव्हेकर २१, अभिजीत देशमुख १-१४);
सामनावीरः किरण देशमुख;

ब्रेव्हहार्ट क्रिकेट क्लबः २० षटकात ६ गडी बाद १६९ धावा (प्रविण मिना नाबाद ३३, स्वप्निल पाटील नाबाद २६,
सुदर्शन गुणे २५, ओंकार गोखले २-२६) पराभूत वि. युनायटेड इलेव्हनः १९.३ षटकात ५ गडी बाद १७१ धावा
(प्रतिक घाटे ५० (२९, ७ चौकार, २ षटकार), हुसेन तांबोळी ३४, अमित फाटक नाबाद २६, राहूल संग्राम २०); सामनावीरः प्रतिक घाटे;

कल्याण इलेव्हनः २० षटकात ७ गडी बाद २४५ धावा (चिराग शेकर ६५ (३१, ६ चौकार, ४ षटकार), रोहीत गुगळे ५३
(२७, ७ चौकार, ३ षटकार), केतन पासळकर ४६, कुणाल शहा नाबाद ३०, तुषार क्षीरसागर ३-२१, रणजीत जगताप २-४८)
वि.वि. राईज-टू-प्ले इलेव्हनः २० षटकात ५ गडी बाद २२५ धावा (विश्‍वेश उंटांगळे ७४ (३७, १३ चौकार, १ षटकार),
बंटी रायकर ५४, कमलेश चौगुले ३९, चिराग शेरकर २-३४); सामनावीरः चिराग शेरकर;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | खुनाचा प्रयत्न करणाऱ्या अमन पठाण व त्याच्या इतर 2 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 49 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA