7th Pay Commission | ‘ही’ गोष्ट वाढल्याने कर्मचार्‍यांच्या पगारात होईल मोठी वाढ! 31,740 रुपयांपर्यंत होऊ शकते वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (central government employees ) पगारात मोठी वाढ (Salary Hike) अपेक्षित आहे. काही रिपोर्टनुसार, नवीन वर्षात सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) वाढवू शकते. त्याचबरोबर कर्मचार्‍यांचे फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) वाढवण्याचाही विचार केला जात असल्याची चर्चा आहे. फक्त फिटमेंट फॅक्टर वाढवला तर कर्मचार्‍यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. (7th Pay Commission)

 

कधी वाढला होता फिटमेंट फॅक्टर?
7वा वेतन आयोग लागू (7th Pay Commission) झाल्यानंतर 2016 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर या कर्मचार्‍यांचे किमान वेतन थेट 6000 रुपयांवरून 18,000 रुपये करण्यात आले.

 

त्यानंतर आजतागायत कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात वाढ झाली. त्याचबरोबर फिटमेंट फॅक्टर तीनपट वाढवावा, अशी मागणी कर्मचार्‍यांची होती. म्हणजेच किमान 18,000 ते 21,000 पगारवाढीची मागणी केली जात आहे.

फिटमेंट फॅक्टरवर निर्णय कधी होऊ शकतो?
केंद्र आणि राज्य कर्मचार्‍यांकडून त्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्क्यांवरून 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी आहे. 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार्‍या अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे.

 

किती होईल वाढ जाणून घ्या कॅलक्युलेशन
जर किमान मूळ वेतन 18,000 रुपये असेल तर भत्ते वगळून वेतन 18,000 X 2.57 = 46,260 रुपये असेल. तर 26000 रुपयांच्या 3% किमान मूळ वेतनाच्या आधारावर एकूण 78000 रुपयांपर्यंत वाढ होईल.

 

म्हणजेच तीन टक्के वाढ झाल्यास एकूण 31,740 रुपयांचा लाभ कर्मचार्‍यांना मिळणार आहे.
म्हणजेच कर्मचार्‍यांच्या एकूण पगारात 31,740 रुपयांनी वाढ होणार आहे.
हे कॅलक्युलेशन किमान मूळ वेतनावर करण्यात आले आहे. जास्तीत जास्त पगार असलेल्यांना अधिक फायद्रा मिळू शकतो.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission central government salary may be increase up to rs 31740 due to fitment factor hike

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NPS | पत्नीच्या नावाने आजच उघडा ‘हे’ स्पेशल अकाऊंट, दर महिना मिळतील 44,793 रुपये; जाणून घ्या पद्धत

Mumbai High Court | शारीरीक संबंधानंतर विवाहाला नकार देणे फसवणूक नाही; मुंबई उच्च न्यायालयाने तरूणाची केली सुटका

Maharashtra GST Department | 233 कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक; GST विभागाची पुण्यात मोठी कारवाई

Ration Card Update | तुमचा सुद्धा झाला असेल विवाह तर रेशन कार्ड करा अपडेट, अन्यथा मिळणार नाहीत अनेक विशेष सुविधा; जाणून घ्या प्रक्रिया