7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना 3 हप्त्यांमध्ये मिळेल 28% डीए, जाणून घ्या केव्हा आणि किती पैसे मिळणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  7th pay commission | आज लाखों केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी (Government Employee’s) मोठी खुशखबर आहे. केंद्र सरकारने (Central Government) वाढीव महागाई भत्ता (DA) सुरू केला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावरील प्रतिबंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारी कर्मचार्‍यांना 17 टक्केऐवजी 28 टक्के महागाई भत्ता मिळेल. सरकारी कर्मचार्‍यांची सप्टेंबरची सॅलरी किती वाढणार ते जाणून घेवूयात… 7th pay commission good news govt employee get 28 percent da hike check details

किती वाढणार DA आणि पगार

समजा कर्मचार्‍याची बेसिक सॅलरी 20,000 रुपये आहे तर त्याचा मासिक डीए 20,000 च्या 28% पर्यंत वाढेल. याचा अर्थ आहे की मासिक ऊअ मध्ये वाढ 20,000 रुपयांच्या 11% म्हणजे एकुण 2200 रुपये होईल. अशाप्रकारे केंद्र सरकारचे इतर कर्मचारी ज्यांच्या 7व्या सीपीसी पे मॅट्रिक्समध्ये वेगवेगळे मासिक मूळ वेतन आहे, ते हे तपासू शकतात की डीए सुरू केल्यानंतर त्यांचे वेतन किती वाढेल.

जाणून घ्या किती एरियर येईल

नॅशनल कौन्सिल ऑफ JCM चे शिव गोपाळ मिश्रा यांच्यानुसार क्लास 1 च्या अधिकार्‍यांचा DA एरियर 11,880 रुपयांपासून 37,554 रुपयांच्या दरम्यान असेल. त्यांनी म्हटले की जर लेव्हल-13 म्हणजे 7वे CPC मूळ वेतनमान 1,23,100 रुपये ते 2,15,900 रुपये किंवा लेव्हल-14 च्या वेतनमानासाठी गणना केली गेली तर केंद्र सरकारच्या एका कर्मचार्‍याची DA बाकी 1,44,200 रुपये ते 2,18,200 रुपयाच्या दरम्यान असेल.

केंद्र सरकारने जानेवारी 2020 साठी DA 4 टक्के वाढवला होता. 3 टक्के 2020 मध्ये आणि नंतर जानेवारी 2021 मध्ये DA 4 टक्के वाढवला होता परंतु कर्मचार्‍यांना डीए जुन्या 17 टक्केच्या दरानेच मिळत होता. कोविडमुळे वाढलेला डीए रोखला होता.

Web Title : 7th pay commission good news govt employee get 28 percent da hike check details

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! महागाई भत्त्यात (DA) मध्ये 11% वाढ

Coconut Oil Face Mask | नारळ तेलाने बनवा हे 2 फेसमास्क, चेहऱ्याचे सौंदर्य उजळेल; जाणून घ्या

MPSC Recruitment | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! MPSC मार्फत 15 हजार 511 पदांसाठी लवकरच भरती होणार