7th Pay Commission latest news | सप्टेंबरपासून केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होणार घसघशीत वाढ, जाणून घ्या किती वाढणार तुमचा पगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी (central government employees) खुशखबर आहे. आता त्यांना सप्टेंबर महिन्यापासून वाढलेली सॅलरी (Salary) मिळेल. सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावरील (Dearness Allowance, DA) वर लावलेला प्रतिबंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच सरकार पेन्शनरसाठी महागाई मदतीवर (Dearness relief) लावलेला प्रतिबंध हटवण्यासाठी तयार झाले आहे. National council (Staff side) ने पत्र जारी करून ही माहिती दिली आहे. 7th pay commission latest news dearness allowance hike dr hike news central employees will get increased da from september pensioners will also get more dr

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

नॅशनल कौन्सिल/जेसीएमच्या कर्मचारी पक्षाचे सचिव शिव गोपाळ मिश्र यांनी सांगितले की, केंद्रीय कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याचे पैसे सप्टेंबरमध्ये दोन महिन्याच्या एरियरसह मिळतील.
कॅबिनेट सचिव डीए आणि डीआर जारी करण्यास तयार झाले आहेत.

याचा अर्थ आहे की, आता केंद्रीय कर्मचारी (central government employees) आणि पेन्शनरचा जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 चा देय महागाई भत्ता
आणि महागाई मदतीचे तिन हप्ते जुलै 2021 मध्ये येणार्‍या महागाई भत्त्याच्या आकड्यासोबत जोडून दिले जातील.
सोबतच जुलै आणि ऑगस्ट 2021 चा एरियर सुद्धा मिळेल.

सरकारच्या या पावलाने सप्टेंबर महिन्यापासून केंद्रीय कर्मचार्‍यांना वाढलेली सॅलरी मिळेल.
केंद्रीय कर्मचार्‍यांना सध्या 17 टक्के डीए मिळत आहे.
जानेवारी 2019 मध्ये तो वाढून 21 टक्के झाला होता.
परंतु कोरोना महामारीमुळे वाढ जून 2021 पर्यंत फ्रीज केला होता.

अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या हिशेबाने पाहिले, तर जून 2020 मध्ये डीएची रक्कम 24 टक्के, डिसेंबर 2020 मध्ये 28 टक्के आणि जुलै 2021 मध्ये 31 टक्केपर्यंत चालेल.
या हिशेबाने सप्टेंबर महिन्यापासून केंद्रीय कर्मचार्‍यांना 31 टक्के डीए मिळेल.
एका 18,000 रुपये बेसिक सॅलरी घेणारे Lower level च्या केंद्रीय कर्मचार्‍यांना डीएमधील वाढीमुळे किती फायदा होईल.

 

समजून घ्या गणित

Level 1 Basic pay = 18000 रुपये
31% DA = 5580 रुपये महीना
Yearly DA = 66,960 रुपये

या हिशेबानुसार, आता 18,000 रुपये बेसिक सॅलरी मिळवणार्‍या कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याच्या रूपात महीन्याचे 5580 रुपये आणि वर्षाचे 66,960 रुपये मिळतील.
आता 17 टक्के डीएच्या हिशेबाने कर्मचार्‍यांना 3060 रुपये महिना महागाई भत्ता मिळतो,
जो वर्षभराचा 36,720 रुपये आहे. या हिशेबाने DA Hike च्यामुळे या कर्मचार्‍यांना
महिन्याचे 2520 रुपये आणि वर्षाच्या हिशेबाने 30,240 रुपयांपेक्षा जास्त प्राप्त होतील.

Web Title : 7th pay commission latest news dearness allowance hike dr hike news central employees will get increased da from september pensioners will also get more dr

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi government | मोदी सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा ! दैनंदिन जीवनात लागणार्‍या ‘या’ गोष्टीचे दर होणार कमी