8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगावर मोठी अपडेट, DA बाबत सरकारने संसदेत काय सांगितले, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 8th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी (Central Employees) सरकार आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) स्थापन करणार की नाही, याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र आता सरकारने सर्व काही स्पष्ट केले आहे. आठव्या वेतन आयोगापर्यंत केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वाढ (DA Hike) करण्याबाबत सरकारने संसदेत तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) यांनी लोकसभेत लेखी उत्तर देताना सरकारी कर्मचार्‍यांच्या पगाराशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

 

8 व्या वेतन आयोगावर विचार नाही

चौधरी यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, केंद्र सरकारी कर्मचार्‍यांसाठी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत असा कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही, जो 1 जानेवारी 2026 पासून लागू केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आठवा वेतन आयोग स्थापन होणार नाही असे नाही, असेही ते म्हणाले. (8th Pay Commission)

 

पगारात वाढ

पंकज चौधरी यांना विचारण्यात आले की, महागाई पाहता सरकारी कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्यासाठी सरकार काय करत आहे ? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, कर्मचार्‍यांना महागाई भत्ता दिला जातो. ऑल इंडिया कन्झ्युमर्स प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स (AICPI) च्या आधारावर महागाई दर ठरवला जातो. या आधारावर कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी बदलला जातो.

 

मार्चमध्ये वाढला होता डीए

महागाईचा दर रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा सातत्याने जास्त आहे. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर 7.01 टक्के होता. जुलै महिन्याची आकडेवारी येणे बाकी आहे. महागाई दराचे आकडे पाहता, असे बोलले जात आहे की सरकार लवकरच केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 4 टक्क्यांनी वाढवू शकते. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांना 34 टक्के दराने डीए मिळत आहे. सरकारने मार्च 2022 मध्ये डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली होती.

 

लवकरच होऊ शकते घोषणा

कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी बदलला जातो, असे अर्थ राज्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
अशाप्रकारे मार्चच्या वाढीनंतर ऑगस्टमध्ये सहा महिने पूर्ण झाले आहेत.
अशावेळी केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता वाढविण्याबाबत सरकार या महिन्यात निर्णय घेऊ शकते.

 

Web Title : –  8th Pay Commission | no proposal for setting up 8th pay commission big update on da hike

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा