‘या’ 9 महिला जगात सर्वात सुंदर, भारतातून फक्त एकच, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सौंदर्याची ज्याची त्याची व्याख्या वेगळी असते. आपल्या सौंदर्यामुळे काही लोक जगभरात ओळखले जातात. आपण आज अशा 9 महिलांबाबत जाणून घेणार आहोत ज्यांनी सर्वात सुंदर महिला म्हणून किताब मिळवला आहे आणि त्या जगभरात आपल्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात.

1) बेला हदीद-
अमेरिकन सुपरमॉडेल बेला हदीदला जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून निवडण्यात आलं आहे. तिचे वडिल फिलिस्तीनी आणि आई डच मूळची आहे. बेलाला तिच्या असामान्य वैशिष्ट्यांमुळं निवडण्यात आलं होतं. या वर्षी बेलाला एका कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर ज्युलियन डी सिल्वा यांनी जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब दिला आहे. क्लासिक ग्रीक ब्युटीच्या आधारावर बेलाच्या सौंदर्याचं वर्णन त्यांनी केलं होतं.

View this post on Instagram

believe you when you say it like thaat..

A post shared by Bella (@bellahadid) on

2) लुपिता न्योंगो –
36 वर्षीय लुपिता न्योंगो ऑस्कर विजेती अभिनेत्री आहे. ती सौंदर्यासाठीही ओळखली जाते. या मेक्सिकन-केनियन स्टारनं सौंदर्याला घेऊन अनेक स्पीच दिले आहेत. जेव्हापासून ती चर्चेत आली आहे तेव्हापासून ती जगातील बेस्ट ड्रेस्ड आणि सर्वात सुंदर च्या यादीत कायम आहे.

View this post on Instagram

NAACP Image Awards 💃🏾 #BlackPanther #UsMovie

A post shared by Lupita Nyong'o (@lupitanyongo) on

3) दीपिका पादुकोण –
भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आणि अनेक पुरस्कार विजेती दीपिका पादुकोण या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दीपिकानं 2007 साली आलेल्या ओम शांति ओम बॉलिवूड डेब्यू केला होता. 2012 साली तिनं पीपल्स पत्रिकाद्वारा इंडियाज मोस्ट ब्युटीफुल वुमनचा किताब मिळवला होता. तिची स्माईल तिच्या सौंदर्यात अजून भर घालते.

4) बियोंसे –
पॉप सिंगर आणि अ‍ॅक्ट्रेस बियोंसे आपल्या सौंदर्यासाठी जगभरात ओळखली जाते. बेला हदीद नंतर गोल्ड रेशो ऑफ ब्युटी फी च्या यादीत बियोंसे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिला पीपल मॅगेझिनकडून जगातील सर्वात सुंदर महिला हा किताब मिळाला आहे.

View this post on Instagram

Shawn Carter Foundation Gala

A post shared by Beyoncé (@beyonce) on

5) एम्बर हर्ड –
अमेरिकन अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडेल एम्बर हर्डचं नाव दीर्घकाळापासून सुंदर महिलांच्या यादी कायम आहे. निळ्या डोळ्यांच्या या अभिनेत्रीनं डॉक्टर ज्युलियन डी सिल्वाच्या गोल्ड रेशो ऑफ ब्युटी फी मध्ये स्थान निर्माण केलं आहे.

View this post on Instagram

11 years ago: Pineapple Express Premiere

A post shared by Amber Heard (@amberheard) on

6) पिया वूर्टबॅच –
पिया वूर्टबॅच फिलीपन-जर्मन मॉडेल आहे. ती एक अभिनेत्री आणि ब्युटी क्वीन आहे. तिनं 20 डिसेंबर 2015 साली मिस युनिव्हर्स 2015 चा ताज घातला होता. या ब्युटी क्वीननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

View this post on Instagram

🥂🥂🥂

A post shared by Pia Wurtzbach (@piawurtzbach) on

7) एरियाना ग्रांडे –
सिंगर एरियाान ग्रांडे तिच्या नाजुक फिगरसाठी ओळखली जाते. डॉक्टर ज्युलियन डी सिल्वाच्या यादीत ती चौथ्या क्रमांकावर आहे.

8) गीगी हदीद –
निळ्या डोळ्यांची गीगी हदीद हीदेखील आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. बेला हदीदच्या कुटुंबातीलच गीगी देखील सौंदर्यासाठी फेमस आहे.

View this post on Instagram

@vmagazine 2015

A post shared by Gigi Hadid (@gigihadid) on

9) कॅट्रिओना ग्रे –
कॅट्रिओना फिलिपीन- ऑस्ट्रेलियन मॉडेल सिंगर, आणि ब्युटी पेजेंट राहिली आहे. तपकिरी डोळ्यांची ही मॉडेल जगभरात आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like