9to5 Google | स्मार्टफोन किंवा गाडी चोरीला गेल्यास आता ‘नो-टेन्शन’, Google करणार हरवलेली वस्तू शोधण्यासाठी मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  9to5 Google च्या एका रिपोर्टनुसार, गुगल एका अशा फीचरवर काम करत आहे ज्याद्वारे एका दुसर्‍या Android फोनचा वापर करून एक हरवलेला Android स्मार्टफोन ट्रॅक करण्यात मदत करेल. सोबतच, ज्या कार नवीन अँड्रॉईड ऑटो इन्फोटेनमेंट सिस्टमसोबत (9to5 Google) येतात, त्या सुद्धा चोरीस गेल्यास ट्रॅक करण्यात मदत होईल (phone and car Tracking without internet). या सर्व्हिसबाबत सर्वकाही जाणून घेवूयात…

विना इंटरनेट फोन आणि कारचे होऊ शकते ट्रॅकिंग

9to5 Google च्या रिपोर्टमध्ये हे सुद्धा म्हटले आहे की, फाईंड माय डिव्हाईस फीचर अंतर्गत आणखी एक सुविधा आहे ज्याद्वारे तुम्ही कुणासोबतही आपल्या डिव्हाईसची ओनरशिप शेयर करू शकता.
या नवीन फीचरने तुम्ही तुमचा हरवलेला फोन इंटरनेट कनेक्शन नसेल तरी शोधू शकता (phone and car Tracking without internet).

कार ट्रॅक करण्याची ही सुविधा वाहनाची सुरक्षा करतेच शिवाय तुमच्या Google अकाऊंटचा अनऑथराईज्ड अ‍ॅक्सेस सुद्धा रोखू शकते.
गुगल या सुविधांवर काम करत आहे.
ही सुविधा कधी सुरू होईल हे अद्याप सांगितलेले नाही.

 

असे काम करेल नवीन फीचर

मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, गुगल एका अशा फीचरवर काम करत आहे.
जे अ‍ॅप्पलच्या ’फाईंड माय’ नेटवर्कचे काम करण्यासारखे आहे.
फाईंड माय अ‍ॅपमध्ये तुम्हाला त्याच अ‍ॅप्पल आयडीवरून साईन इन करावे लागेल जो तुमच्या फोनचा अ‍ॅप्पल आयडी असेल.
जो हरवल्यानंतर अ‍ॅप्पल डिव्हाईसचा शोध घेता येऊ शकतो आणि एयरटॅगचा ट्रॅक ठेवण्यात सुद्धा मदत मिळू शकेल.

XDA Developers च्या एका रिपोर्टनुसार, Google Play Services अ‍ॅपची नवीन आवृत्ती
21.24.13 मध्ये काही कोडचा समावेश आहे – – \”mdm_find_device_network_description\” and \”mdm_find_device_network_title” – – यावरून समजते की गुगल अँड्रॉईड डिव्हाईसवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक सुविधांवर काम करत आहे.
गुगलने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

Web Title : 9to5 Google | google soon help you to track your lost android smartphone and car by using nearby smartphone

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Police | राज्यातील ‘या’ 67 पोलीस अधिकारी-अंमलदाराना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

Sangli Crime | सिगारेट आणायला उशीर झाल्याने मित्रावर सपासप वार करून खून

Delta Plus Variant | पुणे शहरात ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चा पहिला रूग्ण