कामाची गोष्ट ! Aadhaar कार्ड हरवलंय किंवा चोरी झालंय? तर ‘नो-टेन्शन’; ‘या’ पध्दतीनं करा मोबाईल नंबरशिवाय ‘रिप्रिंट’

पोलीसनामा ऑनलाईन – सध्याच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र बनले आहे. सर्वांसाठीच सरकारी आणि खासगी सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे ते जर हरवलं तर अनेक समस्या निर्माण होतात. पण आता त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. तुमचे आधारकार्ड हरवले असेल तर त्याची रिप्रिंट काढता येणार आहे. यासाठी तुम्हाला यापुढे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाचीही गरज भासणार नाही.

आधार कार्डची आवश्यकता लक्षात घेता UIDAI ने रिप्रिंटची सुविधा सुरू केली आहे. यासाठी नोंदणीकृत मोबाइल क्रमांक न देता तुम्ही आधार रिप्रिंट करू शकता. आधार रिप्रिंट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल. तिथे तुम्हाला My Aadhaar हा टॅब दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Order Aadhaar PVC Card असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर नवे कार्ड ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तिथे मोबाईल क्रमांक रजिस्टर नाही असा एक कॉलम दिसेल. त्यावर लक्षपूर्वक क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला अल्टरनेट नंबर टाकावा लागेल. त्यावर एक ओटीपीही तुम्हाला प्राप्त होईल. ओटीपी टाकल्यानंतर तुमच आधार कार्ड रिप्रिंट होईल. तसेच तुम्ही पोस्टाद्वारेही आधार कार्ड घरी मागवू शकता. यासाठी तुमच्याकडून 50 रुपये शुल्क आकारले जाते. दरम्यान, तुम्हाला आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करायचे असल्यास तुम्हाला ते फेस ऑथेंटिकेशननंदेखील डाऊनलोड करता येईल. परंतु यासाठी तुमच्याकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असावा लागतो.