Aaditya Thackeray | आमदार पात्रता निकालावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ”देशासाठी हे मोठे संकेत आहेत…”

मुंबई : Aaditya Thackeray | शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (Shivsena MLA Disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल शिवसेना ठाकरे गटासाठी धक्कादायक ठरला आहे. नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मुळ शिवसेना एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांची असल्याचे म्हटले आहे. तसेच शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरवले आहेत. याशिवाय, भरत गोगावले हेच खरे व्हिप आणि एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड कायदेशीर ठरवली आहे. या निकालावर आता शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पाहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, शिंदे गटाला मूळ राजकीय पक्ष ठरवणे ही लोकशाहीची हत्या आहे. आजचा दिवस महत्त्वाचा असून देशासाठी हे मोठे संकेत आहेत. २०२४ मध्ये अशी गद्दारी आणि राजकारण कायदेशीर झाले तर संविधान बदलले जाईल. भाजपाला संविधान बदलायचे आहे. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान भाजापाला मान्य नाही.

आदित्य ठाकरे म्हणाले, जेवढी वर्षे राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते तेव्हा ते कोणत्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते? एबी फॉर्म कोणाकडून घेत होते? दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या गेल्या ७५ वर्षात पाहिली नाही.

आदित्य ठाकरे म्हणाले, आता खोके सरकारची उलटतपासणी करावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाकडून आता अपेक्षा आहेतच, पण त्याहीपेक्षा जास्त अपेक्षा जनतेकडून आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबुराव राठोड यांचे निधन

Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 81 वी स्थानबध्दतेची कारवाई