Aaditya Thackeray Files Caveats In Bombay HC | दिशा सॅलियन, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ट्विस्ट, आदित्य ठाकरेंकडून हायकोर्टात कॅव्हेट दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aaditya Thackeray Files Caveats In Bombay HC | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सॅलियन प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. याप्रकरणी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. दिशा सॅलियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आले असून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. (Aaditya Thackeray Files Caveats In Bombay HC)

सुशांतसिंह राजपूत आण दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत रशिद खान पठाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी यावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. (Aaditya Thackeray Files Caveats In Bombay HC)

जनहित याचिकेत नेमकं काय?

सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशीची का गरज आहे? हे पटवून देताना अनेक आरोप करण्यात आले आहेत. 8 जून 2020 रोजी दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासण्यात यावे. कारण त्या रात्री हे सर्वजण 100 मीटरच्या परिसरात एकत्र होते. तसेच 13 आणि 14 जून 2020 रोजीचं सुशांत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंह, शौविक चक्रवती यांचे देखील मोबाईल लोकेशन तपासण्यात यावे. या दोन दिवशीच्या आसपासच्या परिसरात आदित्य ठाकरे यांच्या संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावं.

सुशांतसिंह राजपूत याचा मृत्यू झाला त्या दरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणं झालं? याची चौकशी करण्यात यावी. सुशांत आणि रियाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्वांची साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी. भाजप आमदार नीतेश राणे यांनी आदित्य ठाकरेवर केलेल्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणासंदर्भातील आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी याचिकेतून केली आहे.

सुशांत-दिशा मृत्यू प्रकरणात राहुल कनाल यांचा मोठा दावा

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी राहुल कनाल यांनी दोन महिन्यांपूर्वी शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला राम राम केला. कनाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या
शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळा राहुल यांनी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणावर भाष्य केलं.
सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करुन सखोल चौकशी करण्याची मागणी
राहुल कनाल यांनी केली होती. दिशा सालियान प्रकरणाची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची
टीका होत होती. यावर मुख्यमंत्र्यांना उद्देशून कनाल यांनी म्हटले की, जर या प्रकरणात माझे नाव कुठेही आले तर
तुमच्या चपला खाण्यासाठी तयार आहे. या प्रकरणात सखोल चौकशीची गरज आहे, तुम्ही ज्याठिकाणी सांगात तिथे जायला मी तयार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चोरट्याचा दुकानातील रोख रक्कमेवर डल्ला !चोरटा दोन तासात गजाआड; खडक पोलिसांकडून सव्वा 5 लाखांची रोकड जप्त

Pune PMC Skysign Department | बेकायदा फ्लेक्सबाजी कडे दुर्लक्ष करणार्‍या आकाशचिन्ह विभागाच्या चार निरीक्षकांची बदली