Pune PMC Skysign Department | बेकायदा फ्लेक्सबाजी कडे दुर्लक्ष करणार्‍या आकाशचिन्ह विभागाच्या चार निरीक्षकांची बदली

आकाशचिन्ह विभागाचा प्रस्ताव मान्यतेसाठी अतिरिक्त आयुक्तांकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Skysign Department | शहरात सर्वत्र बेकायदा फ्लेक्स आणि बॅनरचा सुळसुळाट झाला आहे. एवढेच काय तर महापालिकेने जी २० परिषदेच्या निमित्ताने सीएसआरच्या माध्यमांतून सुशोभित केलेल्या चौकांमध्येही मोठ्या प्रमाणावर फ्लेक्सबाजी करून विद्रुपीकरण करण्यात आले आहे. यानंतरही फ्लेक्सबाजांवर कुठलिही कारवाई होत नाही. दरम्यान, प्रशासनाने पुन्हा एकदा अधिकृत फ्लेक्सवर कारवाईसाठी पावले उचलली असून सुरूवात आकाशचिन्ह विभागातूनच केली आहे. बेकायदा फ्लेक्सविरोधात कारवाईत आढेवेढे घेणार्‍या चार निरीक्षकांची खात्यातूनच उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune PMC Skysign Department)

बेकायदा फ्लेक्स आणि होर्डींग्जवरून उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महापालिकेला झापले आहे. या निकालानंतर महापालिकेने बेकायदा होर्डींग्जवर कारवाईसाठी कडक पावले उचलली आहेत. मागील वर्षभरात पाचशेहून अधिक बेकायदा होर्डींग्ज काढून टाकण्यात आली आहे. तसेच बेकायदा होर्डींंग्ज असलेल्या इमारतींच्या मिळकतकरावर बोजाही चढवायला सुरूवात केली आहे. दरम्यान दहीहंडी आणि गणेशोत्सवानंतर शहरातील प्रत्येक चौक आणि रस्त्यांच्या कडेला मोठया प्रमाणावर फ्लेक्स दिसून येत आहेत. प्रामुख्याने वाढदिवसांच्या शुभेच्छा आणि अन्य अभिनंदनपर फ्लेक्सची संख्या अगणित आहे. एवढेच काय आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी काही भावी ‘लोकप्रतिनिधींनी’ रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विजेचे खांबही पोस्टर्स आणि बॅनरने व्यापून टाकले आहेत. परंतू यावर ज्या गतीने जरब बसविणारी कार्यवाही होणे गरजेचे आहे, ती केली जात नाही. (Pune PMC Skysign Department)

या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेच्या दृष्टीने बेकायदा बॅनर्सवर कारवाईची
मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पंधराही क्षेत्रिय कार्यालयातील आकाशचिन्ह निरीक्षकांना त्यादृष्टीने आदेशही दिले आहेत. वरिष्ठांच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करणे चार निरीक्षकांना भोवले आहे. कोथरूड, सिंहगड रोड, येरवडा आणि अन्य एका क्षेत्रिय कार्यालयातील निरीक्षकांची बदली अन्य विभागामध्ये करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आला असून अतिरिक्त आयुक्तांच्या अंतिम आदेशासाठी तो ठेवण्यात आला आहे. यापुढील काळातही बेकायदा फ्लेक्सबाजीकडे दुर्लक्ष करणार्‍या निरीक्षक व अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चोरट्याचा दुकानातील रोख रक्कमेवर डल्ला !चोरटा दोन तासात गजाआड;
खडक पोलिसांकडून सव्वा 5 लाखांची रोकड जप्त

ACB Trap News | पोलीस ठाण्यात लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात