Aaditya Thackeray Maval Road Show | आदित्य ठाकरेंचा मावळमध्ये रोड शो, भाजपावर हल्लोबोल करताना म्हणाले, 400 तर सोडा, 200 पार जाणं सुद्धा कठीण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Aaditya Thackeray Maval Road Show | मावळ लोकसभा मतदारसंघाचे (Maval Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार (Mahavikas Aghadi Candidate) संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मावळमध्ये रोड शो केला. या रोड शो ला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीवर (Aaditya Thackeray On BJP) जोरदार हल्लाबोल केला. तसेच विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ४०० तर सोडा, २०० पार जाणेसुद्धा भारतीय जनता पार्टीला कठीण असेल, असे आदित्य म्हणाले.(Aaditya Thackeray Maval Road Show)

आदित्य ठाकरे म्हणाले, आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर हाती येणारे अंदाज पाहता इंडिया आघाडीकडे मतदारांचा कल स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे ४०० तर सोडा, २०० पार जाणेसुद्धा भारतीय जनता पार्टीला कठीण असेल.

भाजपावर हल्लाबोल करताना आदित्य ठाकरे म्हणाले, भाजपाला जेव्हा समोर पराभव दिसू लागतो तेव्हा तेव्हा ते देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करतात. जातीयवाद उफाळून आणतात, प्रांतवाद निर्माण करतात. परंतु देशासमोर महागाई आणि बेरोजगारी हे दोन महत्त्वाचे मुद्दे असताना त्याबद्दल ते चकार शब्दही काढत नाहीत.

आदित्य ठाकरे यांनी पियुष गोयल यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, दहा वर्षांनी का होईना परंतु पियुष गोयल
यांना महाराष्ट्राची आठवण झाली हे आपले नशीबच समजायचे. त्यांच्याकडे अर्थ, रेल्वे अशी महत्त्वाची खाती होती.
परंतु त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीही केले नाही. रेल्वे स्थानकांची नावे बदलत आहेत परंतु परिस्थिती बदललेली नाही.

ते पुढे म्हणाले, पियुष गोयल यांनी केलेले महाराष्ट्र हिताचे एखादे तरी काम सांगावे. कोरोना काळात २३ मार्च रोजी परप्रांतातील मजदूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी रेल्वे गाड्या सुरू करा असा आम्ही आक्रोश करत होतो. तेव्हा या महाशयांना महाराष्ट्राकडे बघण्याची सवड नव्हती.

महायुती सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवताना आदित्य ठाकरे म्हणाले, जून २०२२ पर्यंत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना
असे वाटत होते की वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातच राहील. त्यांनी एखाद्या कॉन्ट्रॅक्टर प्रमाणे वक्तव्य केले होते.
कारण त्यांच्या आजूबाजूला नेहमी कॉन्ट्रॅक्टर असतात.
तळेगाव येथे होणारा हा प्रकल्प पुढे गुजरातला गेल्यानंतर तो देशाबाहेर निघून गेला.

आदित्य ठाकरे म्हणाले, जेव्हा जेव्हा तुम्ही सत्य मांडायचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्यावरती गुन्हे दाखल होतात.
उद्या जर का तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एखादी सत्य बातमी लिहीलीत तर ही मंडळी पत्रकारांवर देखील
गुन्हे दाखल करतील, अशी टीका आदित्य यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : चोरट्यांना पोलीस उपनिरीक्षकाने हटकले, दोघांकडून थेट गोळीबार; भरदिवसा घडलेल्या घटनेने तळेगावात खळबळ