नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम आदमी पक्षाच्या पॉलिटीकल अफेअर्स कमिटीची बैठक मंगळवारी पार पाडली. यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या सर्वच 70 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली गेली. यानुसार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया हे पतपरगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी आपने 15 विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं आहे. त्या 15 आमदारांच्याजागी नवीन उमेदवार देण्यात आले आहेत. यात काही असे आमदार आहेत ज्यांनी पूर्वीच बंडखोरी केली आहे.
Best wishes to all. Don’t be complacent. Work v hard. People have lot of faith in AAP and u. God bless. https://t.co/JuuvriCoNG
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 14, 2020
आम आदमी पक्षाने तिमारपूरचे विद्यमान आमदार पंकज पुष्कर यांचं तिकीट कापून दिलीप पांडे यांना उमेदवारी दिली आहे. बवानाचे विद्यमान आमदार रामचंद्र यांचं तिकीट कापून जय भगवान उपकार यांना उमेदवारी दिली आहे. मुंडकामधून सुखबीर दलाल यांचं तिकीट कापत धर्मपाल लाकडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं गेलेले 15 आमदार पुढीलप्रमाणे-
मतदारसंघ विद्यमान आमदार तिकीट मिळालेले आमदार
1) तिमारपूर पंकज पुष्कर दिलीप पांडे
2) बवाना रामचंद्र जय भगवान उपकार
3) मुंडका सुखबीर दलाल धर्मपाल लाकडा
4) पटेल नगर हजारीलाल चौहान राजकुमार आनंद
5) हरिनगर जगदीप सिंह राजकुमारी ढील्लो
6) द्वारका आदर्श शास्त्री विनय मिश्रा
7) राजेंद्र नगर विजेंद्र राघव चड्ढा
8) कालकाजी अवतार सिंह आतिशी
9) बदरपूर नारायण दत्त शर्मा राम सिंह नेताजी
10) त्रिलोकपुरी राजू दिन गान रोहित कुमार मैहरोलिया
11) दिल्ली कँट कमांडो सुरेंद्र वीरेंद्र सिंह कादियान
12) कोंडली मनोज कुमार कुलदीप कुमार
13) सीलमपूर हाजी इशराक अब्दुल रहमान
14) गोकुलपूर चौधरी फतेह सिंह चौधरी सुरेंद्र कुमार
15) मटिया महल आसिम अहमद खान शोएब इकबाल
फेसबुक पेज लाईक करा –
- झोपण्यापूर्वी ‘मोबाईल चेक’ करण्याच्या सवयीमुळे होतात ‘हे’ 6 धोके
- ‘चॉकलेट’ च्या पसंतीवरून समजते तुमचे व्यक्तिमत्व, ‘हे’ 5 प्रकार लक्षात ठेवा
- रिकाम्यापोटी चहा घेण्याचे ‘हे’ 4 धोके! वेळीच व्हा सावध!
- लाल कांद्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?
- ‘हेल्दी लिव्हर’ साठी ‘या’ 4 पदार्थांचा आहारात करा समावेश
- तणावग्रस्त असणार्यांनी करावेत ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या फायदे
- हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ‘या’ 4 तपासण्या करा ! जाणून घ्या 6 लक्षणे