मोठी बातमी : आरोग्य सेतु अ‍ॅपवर मिळत आहे ब्लू टिक, ‘या’ लोकांना मिळू शकते; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – डिजिटल जगतात अकाऊंटच्या सोबत टिक चे खुप महत्व असते. एखादी कंपनी ब्ल्यू टिक देते तर एखादी गोल्डन टिक देते. ट्विटरची पब्लिक ब्ल्यू टिक अलिकडेच सुरू झाली आहे. मात्र, अनेक लोकांना अजूनही तिचे अपडेट मिळालेले नाही. आता भारत सरकारने लोकांना आरोग्य सेतु अ‍ॅपवर ब्ल्यू टिक देण्याची घोषणा केली आहे. आरोग्य सेतु अ‍ॅपने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

आरोग्य सेतू अ‍ॅप त्या लोकांच्या अकाऊंटला ब्ल्यू टिक मिळेल ज्यांनी व्हॅक्सीन घेतली आहे. आरोग्य सेतु अ‍ॅपवर व्हॅक्सीन घेणार्‍यांना ब्ल्यू टिक आणि ब्ल्यू शील्ड मिळेल. याचा फायदा हा होईल की विना सर्टिफिकेट पहाता त्या लोकांची ओळख आरोग्य सेतु अ‍ॅपद्वारे पटू शकते, ज्यांनी व्हॅक्सीन घेतली आहे.

आरोग्य सेतुने ट्विट करून म्हटले आहे की, आता तुमचे व्हॅक्सीनेशन स्टेस्टस अ‍ॅपमध्ये दिसेल. व्हॅक्सीन घ्या आणि ब्ल्यू शील्डसह ब्ल्यू टिक सुद्धा मिळवा. आरोग्य सेतु अ‍ॅपच्या होम स्क्रीनवर यूअर स्टेटस टॅबमध्ये तुम्हाला डबल ब्ल्यू टिक आणि ब्ल्यू शील्ड पहायला मिळेल. ब्ल्यू टिक आणि ब्ल्यू शील्ड तेव्हाच दिसेल जेव्हा व्हॅक्सीनचे दोन डोस घेतलेले असतील.