Abdul Sattar | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी, संतापलेल्या अब्दुल सत्तारांनी युवकांना सुनावले, पण आक्षेपार्ह भाषेमुळे…

सिल्लोड : Abdul Sattar | बुधवारी सिल्लोडमध्ये नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात (Gautami Patil Program) काही प्रेक्षकांनी गोंधळ, हुल्लडबाजी सुरु केली. हे पाहून संतापलेले आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी माईक हातात घेत गोंधळ घालणाऱ्या युवकांना सुनावले. पण, भाषा चुकीची वापरल्याने आता सत्तार यांच्यावरच टीका होऊ लागली आहे. दरम्यान, याबाबत सत्तार यांनी योग्य तो खुलासा तातडीने केला आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ, हुल्लडबाजी सुरू झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी संबंधितांना आवरायचे निर्देश पोलिसांना दिले. अब्दुल सत्तार म्हणाले, ”पोलीसवाले…पाठीमागच्या लोकांना लाठीचार्ज करा. त्यांना इतकं मारा की त्यांचीxxx तुटून जाईल. हाणा त्यांना. ए खाली बैस.. साxx तुझ्या बापानं पाहिला होता का कार्यक्रम? तू काय राक्षस आहेस का? माणसाची औलाद आहेस, माणसासारखा कार्यक्रम घ्या”.

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा उद्देश चांगला असला तरी चुकीची भाषा आणि अपशब्द वापरल्याने सत्तार
यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. दरम्यान, याबाबत खुलासा करताना अब्दुल सत्तार यांनी म्हटले की,
मी ग्रामीण भाषेतल्या बोलीमध्ये बोलून गेलो, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो.
तिथे ६५ हजार जनता होती, त्यात २० हजार महिला व मुले होती. त्यामुळे ते सुरक्षितपणे घरी पोहोचणे गरजेचे होते, म्हणून मी आक्रमकपणे हुल्लडबाजी करणाऱ्यांना ओरडलो, असा खुलासा सत्तार यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दुचाकीच्या चाकावरुन आरोपीला अटक, महाळुंगे पोलिसांकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील 29 लाखांचा ऐवज जप्त

पोलिसांना पैसे देण्याच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक, कोंढवा परिसरातील प्रकार

Nashik Crime News | खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला तलवारीसह नाशिक पोलिसांकडून अटक, 8 महिन्यांपासून होता फरार