Abdul Sattar On Shivsena Dasara Melava | मंत्री अब्दूल सत्तार यांचा शिवसेनेला इशारा, म्हणाले – ‘घुसून सभा घेतली तर…’, दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद चिघळणार!

मुंबई : Abdul Sattar On Shivsena Dasara Melava | दसरा मेळाव्यावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाजी पार्कची जागा मिळाली नाही, तरीही दसरा मेळावा घेणारच, असे शिवसेना नेते म्हणू लागले आहेत. दरम्यान, अजूनही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मिळालेली नाही. मात्र, बीकेसीतील एमएमआरडीएचे मैदान शिंदे गटाला देण्यात आले आहे. दरम्यान, शिवाजी पार्क सील केले तर ते तोडून टाकू असे शिवसेनेने म्हटले आहे. यावर आता शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी इशारा दिल्याने वातावरण तापण्याची शक्यता आहे. (Abdul Sattar On Shivsena Dasara Melava)

शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले होते की, परवानगी कशी देत नाहीत? परवानगी द्यावीच लागेल. सर्व शिवसैनिक मुंबईत येतील. शिवाजी पार्क सील केले तर ते तोडून टाकू, पण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार.

शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेवर शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी इशारा दिला आहे. सत्तार यांनी म्हटले की, तोडून आणि घुसून सभा घेता येत नाही. शिवाजी पार्कवर कोणीही घुसखोरी करुन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र सरकारच्या सर्व सरकारी यंत्रणा सज्ज आहेत. (Abdul Sattar On Shivsena Dasara Melava)

शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांना सोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह राज्यभरातील पदाधिकार्‍यांना दिले आहेत.

दरम्यान, प्रशासनाने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान देण्यास टाळाटाळ चालवल्याने शिवसेनेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
बीएमसी जी वॉर्ड सहाय्यक आयुक्तांविरोधात शिवसेना कोर्टात गेली आहे.
या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.

Web Title :- Abdul Sattar On Shivsena Dasara Melava | minister abdul sattar has warned shivsena chief uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Decisions | शिंदे-फडणवीस सरकारचं पोलिसांना गिफ्ट ! महाराष्ट्र पोलिसांच्या नैमित्तिक रजेत वाढ, 7231 पदांची पोलीस भरती होणार

Sharad Pawar To Shinde-Fadnavis Govt | शरद पवारांचे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान, म्हणाले – ‘पत्राचाळ प्रकरणी लवकर चौकशी करा, आम्ही तयार’