ACB Trap Case | अनुसुचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी, महसूल सहायक व खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case | राजगौंड जातीच्या अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी 30 हजार रुपये लाच स्वीकारताना उपविभागीय कार्यालय माजलगाव येथील महसूल सहायक व खासगी व्यक्तीला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.24) माजलगाव उप विभागीय कार्यालयात करण्यात आली. (ACB Trap Case)

महसूल सहायक वैभव बाबुराव जाधव (वय 44), खाजगी इसम शेख आसेफ शेख अहमद (वय 24) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत धारुर येथील 44 वर्षीय व्यक्तीने बीड एसीबीकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार यांच्या दोन मुलांचे व त्यांच्या भावाच्या दोन मुलांचे तसेच भावाची मुलगी आणि बहीन असे सहा व्यक्तींचे राजगौंड जातीचे अनुसुचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळणे करीता सेवासेतु केंद्रातून धारुर तहसिल कार्यालय येथे ऑनलाईन पध्दतीने प्रकरणे दाखल केली होती. तहसिल कार्यालयाची कारवाई होऊन तक्रारदार यांना सर्व प्रकरणे उपविभागीय कार्यालय माजलगाव येथे दाखल केले. या प्रकरणात महसूल सहायक वैभव जाधव यांनी उपविभागीय अधिकारी माजलगाव यांचेकडुन चार प्रकरणांचे जात प्रमाणपत्र मिळवून दिले. याचा मोबदला म्हणुन वैभव जाधव यांनी उप विभागीय अधिकारी, माजलगाव यांच्यासाठी करीता 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी बीड एसीबीकडे तक्रार दिली.

एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, वैभव जाधव याने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाचेची मागणी
करुन तडजोडी अंती 40 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. ठरलेल्या रक्कमेपैकी 30 हजार रुपये बुधवारी मागणी
करुन स्विकारण्याचे मान्य केले. यानंतर पथकाने सापळा रचला. आरोपी खाजगी इसम शेख असेफ याने वैभव जाधव
यांच्या सांगण्यावरुन बुधवारी उपविभागीय कार्यालय माजलगाव येथे स्वीकारले. पैसे स्वीकारताच पथकाने शेख याला
ताब्यात घेतले. यानंतर महसूल सहायक वैभव जाधव याला ताब्यात घेतले. दोघांवर माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, प्रभारी अपर पोलिस अधीक्षक राजीव तळेकर
यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एसीबीचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे, पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, हनुमान गोरे,

संतोष राठोड, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भरलेल्या गॅस सिलेंडर मधील गॅस चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Police MPDA Action | जनता वसाहत मधील अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 96 वी कारवाई

देहूरोड येथे साडे 11 लाखांचा गुटख्याचा साठा जप्त, एकाला अटक