Pune Pimpri Chinchwad Crime News | भरलेल्या गॅस सिलेंडर मधील गॅस चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड पोलिसांनी गॅस सिलेंडरचा (Gas Cylinder) काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (PCPC Crime Branch) युनिट एकच्या पथकाने घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये भरुन त्याची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या कारवाईत 1 लाख 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.23) चिखली परिसरातील एका पत्र्याच्या गोडाऊन येथे केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याप्रकरणी युनिट एकचे पोलीस हवालदार सोमनाथ बाबासाहेब बोऱ्हाडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भुजंगनाथ दिलीप पाटील (वय-28 रा. जाधववाडी, शिव रोड, चिखली मुळ रा. मु.पो. भोपणी पोलीस होनाळी ता. देवणी जि. लातुर), संभाजी बालाजी उपासे (वय-24 रा. जाधववाडी, शिव रोड चिखली) यांच्यावर आयपीसी 420, 285 सह जिवनावश्यक वस्तुंचा कायदा 1955 चे कलम 3,7 सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन 1908 चे कलम 5 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जाधववाडी येथील एका पत्र्याच्या शेडमधील गोडाउनमध्ये छापा टाकला. त्यावेळी आरोपी घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिफीलिंग सर्कीटच्या सहाय्याने गॅस अवैधरित्या दुसऱ्या सिलेंडर मध्ये भरताना आढळून आला.

आरोपी हे बेकायदेशीर रित्या कोणत्याही परवानगी शिवाय व कोणत्याही सुरक्षितते शिवाय भरलेल्या सिलेंडर मधील गॅस रिकाम्या गॅस टाकीमध्ये भरत होता. यावेळी जिवीतास धोका होण्याची शक्यता असताना देखील आरोपी हा बेकायदेशीर कृत्य करत असताना आढळून आले. त्याच्याकडून 1 लाख 96 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकारणी वडिलांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मित्राला दगडाने मारहाण, दोघांवर FIR; स्वारगेट परिसरातील घटना

गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार, तरुणाला अटक; हडपसर परिसरातील प्रकार

President’s Medal | उल्लेखनीय सेवेबद्दल कारागृह सेवेतील 9 जणांना राष्ट्रपती पदक जाहीर

आयएसआयएस दहशतवादी संघटनेला फायनान्स करणार्‍यास एटीएसकडून अटक; उच्च शिक्षित अभियंता हुजेफ शेखचा अनेक देशात प्रवास

Pune Balewadi Crime | WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 11 मुलींची सुटका (Video)

Pune Police Inspector Transfers | पुणे पोलीस आयुक्तालयातील 17 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Shivsena UBT Group | अजित पवारांनीही मोदीमुक्त रामाचे भजन खासगीत सुरू केले का? शिवसेनेचा सवाल

Rupali Chakankar | अजितदादांवर कारवाई सुरू असताना ‘काळजीवाहू ताई’ रस्त्यावर का उतरल्या नाहीत? रुपाली चाकणकरांचा सवाल