ACB Trap Case | लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case | मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डाला वारस हक्काने नाव लावण्यासाठी सहा हजार रुपये लाच स्वीकारताना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. निवास वसंत पाटील Niwas Vasant Patil (वय-43 सद्या रा. सामंत बिल्डिंग, आजरा, मुळ रा. कसबा वाळवे ता. राधानगरी) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या उप अधीक्षकाचे नाव आहे. एसीबीने ही कारवाई शुक्रवारी (दि.20) भूमि अभिलेख कार्यालयात केली. (ACB Trap Case)

याबाबत 29 वर्षाच्या व्यक्तीने कोल्हापूर एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या आईचा मामा यांना वारस नसल्याने त्यांनी त्यांची मिळकत मृत्युपत्राद्वारे तक्रारदार यांची आई हयात असताना त्यांचे नावे केली होती. तक्रारदार यांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांना मृत्युपत्राद्वारे मिळालेल्या मिळकती मधील गाव चिमणी, आजरा येथील मिळकतीचे प्रॉपर्टी कार्डाला वारसा हक्काने तक्रारदार यांचे तसेच त्यांचे वडील व भाऊ यांचे नाव लावायचे होते. वारसदाराची नावे लावण्यसाठी निवास पाटील यांनी सहा हजार रुपये लाचेची मागणी केली. (ACB Trap Case)

तक्रारदार यांनी याबाबत कोल्हापूर एसीबी कडे तक्रर केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता वारसदारांची नावे लावण्यासाठी उप अधीक्षक निवास पाटील यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शुक्रवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur Bribe Case)

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे, पोलीस निरीक्षक बापु साळुंके, सहा. फौ प्रकाश भंडारे,
पोलीस अंमलदार सुनील घोसाळकर सचिन पाटील, संदीप काशीद यांच्या पथकाने केली. (Kolhapur ACB Trap)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | पोलीस चौकीत लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Punit Balan Group Felicitates Rituja Bhosle | पुनीत बालन ग्रुपच्या पाठीब्यामुळेच सुवर्णपदकाला गवसणी; ऋतुजा भोसले हिचे उद्गार (Video)