ACB Trap Case | लाच स्वीकारताना सायबर सेल मधील पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case | सापडलेला मोबाईल वापरल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागून 5 हजार रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणी हिंगोली पोलीस (Hingoli Police) अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल विभागातील (Hingoli Cyber Cell) पोलीस अंमलदारावर हिंगोली एसीबीच्या पथकाने गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. दिपक हरिदास पाटील Deepak Haridas Patil (वय 36 रा. रामकृष्णा सिटी, बळसोंड, हिंगोली ता.जि. हिंगोली) असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. (Hingoli Bribe Case)

याबाबत 34 वर्षीय व्यक्तीने 9 सप्टेंबर 2023 रोजी हिंगोली एसीबीकडे तक्रार केली आहे. दिपक पाटील याने 24 एप्रिल 2024 रोजी फोन पे द्वारे लाचेची रक्कम स्वीकारली. तक्रारदार हे मौजे बोरी शिकारी ता.जि.हिंगोली येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार हे मार्च 2023 मध्ये हिंगोली ते सायाळा गावाकडे जात होते. त्यावेळी गारमाळ उड्डाण पुलाजवळ त्यांना एक मोबाईल सापडला होता. तो मोबाईल तक्रारदार हे त्यांच्या मेहुणे यांच्या नावावर असलेले सिम कार्ड टाकून वापरत होते.(ACB Trap Case)

दरम्यान, 22 एप्रिल 2023 रोजी तक्रारदार यांना सायबर सेल हिंगोली येथून पोलीस अंमलदार आरोपी दिपक पाटील
यांनी सापडलेला मोबाईल घेऊन सायबर सेल हिंगोली येथे बोलविले.
त्यानंतर तक्रारदार हे मोबाईल घेऊन दिपक पाटील यांच्याकडे गेले असता, दिपक पाटील यांनी तक्रारदार यांना
सापडलेला मोबाईल जमा करण्यास सांगितले. तक्रारदार हे मोबाइल गैर पद्धतीने वापरत असल्याचे सांगुन त्यांच्यावर
कुठलीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी आरोपी दिपक पाटील यांनी तक्रारदार
यांच्याकडे 20 हजार रुपयाची लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 5 हजार रुपये घेण्याचे मान्य केले.
त्याप्रमाणे 22 एप्रिल 2023 रोजी बारा वाजण्याच्या सुमारास आरोपी दिपक पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून फोन पे द्वारे पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur-Pune Lok Sabha | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 13 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव तसेच सार्वजनिक सभा बैठका घेण्यास बंदी

Maval Lok Sabha | मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ! पात्र मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे- दीपक सिंगला