ACB Trap Case News | लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर एसीबीकडून FIR

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Case News | गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी तसेच गुन्ह्यामध्ये वाढीव कलम न लावता तपासात मदत करण्यासाठी 5 हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या चंदगड पोलीस ठाण्यातील (Chandgad Police Station) पोलीस हेड कॉन्स्टेबल विरुद्ध कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Kolhapur ACB) गुन्हा दाखल केला आहे. राजीव शामराव जाधव Rajiv Shamrao Jadhav (वय-44 सध्या रा. साधना कॉलेजच्या मागे, काजूबाग गल्ली, गडहिंग्लज ता.गडहिंग्लज, मुळ गाव कौलगे ता. गडहिंग्लज जिल्हा.कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. एसीबीने ही कारवाई शुक्रवारी (दि.6) केली. (ACB Trap Case News)

याबाबत 35 वर्षाच्या व्यक्तीने कोल्हापूर एसीबी कार्यालयात तक्रार केली आहे. तक्रारदार हे व्यवसायाने वैद्यकीय साहित्य पुरविण्याचे काम करत असून कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत. ते त्यांच्या मुळ गावी दाटे ता. चंदगड येथे गेले असताना त्यांच्यावर तसेच त्यांची आई व भाचा पुंडलीक खरुजकर यांच्यावर शेजारी राहणाऱ्या संजना खरुजकर यांनी चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे. या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी तक्रारदार, त्यांची आई व भाचा याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास चंदगड पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल राजीव जाधव यांच्याकडे होता. (ACB Trap Case News)

राजीव जाधव यांनी तक्रारदार, त्यांची आई व भाचा यांना चंदगड पोलीस ठाण्यात बोलावून घेवुन त्यांना नोटीस दिली. तसेच दिवसभर पोलीस ठाण्यात बसवुन ठेवले. जाधव यांनी गुन्ह्यात अटक न करण्याबाबत, गुन्ह्यामध्ये वाढीव कलम न लावण्याबाबत तसेच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात राजीव जाधव लाच मागत असल्याची तक्रार केली.

प्राप्त तक्रारीवरुन कोल्हापूर एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता राजीव जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे
5 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती साडे चार हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
राजीव जाधव यांनी स्वत:च्या पदाचा दुरउपयोग करुन लाचेची मागणी केल्याने त्यांच्याविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे, पोलीस निरीक्षक बापू साळुंखे, श्रेणी
पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, पोलीस अंमलदार सुनील घोसाळकर, विकास माने, सचिन पाटील,
संदीप काशिद, मयुर देसाई, रुपेश माने, उदय पाटील यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray On Maharashtra Govt | ‘पेशंट टेबलावर आणि डॉक्टर दौर्‍यावर असा उथळ कारभार सध्या सुरु’; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात (व्हिडिओ)