ACB Trap Case News | लाच घेताना माध्यमिक आश्रम शाळेचा ग्रंथपाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, शिक्षण क्षेत्रात खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – ACB Trap Case News | कालबद्ध वेतनश्रेणी मंजूर करुन आणण्यासाठी 7 हजार रुपये लाच स्वीकारताना चाळीसगाव तालुक्यातील करगाव माध्यमिक आश्रम शाळेच्या ग्रंथपाल याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. श्रीकांत गुलाब पवार Shrikant Gulab Pawar (वय 38) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोच ग्रंथपालाचे नाव आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.6) केली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (ACB Trap Case News)

याबाबत चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथील 41 वर्षाच्या व्यक्तीने जळगाव एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार हे करगाव माध्यमिक आश्रम शाळेत कर्मचारी आहेत. तक्रारदार यांची कालबध्द वेतनश्रेणी जळगावच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाकडून मंजूर करुन आणण्यासाठी यापूर्वी फोन-पे वर श्रीकांत पवार यांनी 15 हजार रुपये लाच स्वीकारली होती. त्यानंतर नाशिक येथील प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभागातून पदोन्नतीची थकीत रक्कम 85 हजार 519 रुपये मंजूर करुन आणण्यासाठी 16 टक्क्याप्रमाणे 12 हजार रुपये लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी जळगाव एसीबी कार्य़ालयात तक्रार केली. (ACB Trap Case News)

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता ग्रंथपाल श्रीकांत पवार याने तक्रारदार यांच्याकडे 12 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी पथकाने सापळा रचला. श्रीकांत पवार याने पंचासमक्ष पहिला हप्ता म्हणून 7 हजार रुपये स्वतः स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. पवार याच्यावर चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,
वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख,
पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील,
सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलीस अंमलदार सुनिल वानखेडे, बाळू मराठे, राकेश दुसाने, रविंद्र घुगे, शैला धनगर,
किशोर महाजन, प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On Caste Wise Census | बिहारमधील जातिनिहाय जनगणनेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश