ACB Trap News | 45 हजार रुपये लाच घेताना महावितरण कंपनीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | नवीन इलेक्ट्रिक मीटर बसवुन देण्यासाठी 45 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) यवतमाळ महावितरण कंपनीच्या (MSEDCL) सहायक अभियंता कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. गजानन मारोतराव भोयर Gajanan Marotrao Bhoyer (वय-35 रा. विश्वास नगर, प्रजापति लेआउट वडगांव रोड ,यवतमाळ) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई यवतमाळ शहरातील आर्णी रोडवरील सहकार भवन जवळ असलेल्या श्री स्वामी एक्वा वाटर फिल्टर दुकानाच्या बाजूला करण्यात आली. ACB Trap News)

याबाबत रेणुका नगर, जांब रोड वडगाव येथील 28 वर्षीय व्यक्तीने यवतमाळ एसीबीकडे (Yavatmal ACB) मंगळवारी (दि.28) तक्रार दिली आहे. लाचखोर गजानन भोयर हा यवतमाळ येथील महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता कार्यालय वडगाव येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे. गजानन भोयर याने तक्रारदार यांना नवीन इलेक्ट्रीक मीटर बसवून देण्यासाठी 45 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालयात तक्रार केली. ACB Trap News)

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीची मंगळवारी पडताळणी केली. त्यावेळी वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन बोयर याने
तक्रारदार यांना नवीन इलेक्ट्रिक मीटर (Electric Meter) बसवून देण्यासाठी 45 हजार रुपये लाच मागितल्याचे
निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी (दि.29) आर्णी रोडवरील सहकार भवन जवळ सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना गजानन भोयर याला रंगेहाथ पकडण्यात आले.
त्याच्यावर अवधुतवाडी पोलीस ठाण्यात (Avadhutwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे (Amravati Zone) पोलीस अधीक्षक मारुती जगताप (SP Maruti Jagtap),
अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे (Addl SP Devidas Gheware), यवतमाळ एसीबीचे पोलीस उपअधीक्षक
उत्तम वि.नामवाडे (DySP Uttam v. Namwade) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित वानखडे
(PI Amit Wankhade), पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर (PI Vinayak Karegaonkar),
पोलीस अंमलदार अब्दुल वसीम, सुधीर काबळे, महेश वाकोडे, राकेश सावसाकडे, इफ़राज़ काज़ी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | पुणे : प्रेमविवाहाची इच्छा अधुरी, संसार थाटण्यापूर्वीच काळाचा घाला; ट्रक अपघातात जोडीदाराचा मृत्यू तर तरुणी गंभीर जखमी

Pune Crime News | कन्सलटन्सी कंपनीतील महिलेचा विनयभंग, डेक्कन परिसरातील प्रकार