Pune Accident News | पुणे : प्रेमविवाहाची इच्छा अधुरी, संसार थाटण्यापूर्वीच काळाचा घाला; ट्रक अपघातात जोडीदाराचा मृत्यू तर तरुणी गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | प्रेमविवाह (Love Marriage) करण्यासाठी मुलीला ट्रकमधून पळवून आणले. पशुखाद्य असलेला हा ट्रक लोणी काळभोर परिसरातील शिंदवणे घाटात (Shindwane Ghat) पलटी झाला. यामध्ये ट्रकचालक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. डोळ्यासमोर भावी जोडीदाराचा मृत्यू झाल्याने दोघांची प्रेमविवाह करण्याची इच्छा अधुरी राहिली. ही घटना 26 नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास शिंदवणे घाटात घडली. (Pune Accident News)

रामेश्वर लक्ष्मण शिंदे (वय-21 रा. शेलु मानवद ता. परतुड, जि. परभणी) असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई (Police Constable) तुकाराम सदाशिव पांढरे Tukaram Sadashiv Pandhare (वय-36) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी मयत रामेश्वर शिंदे याच्यावर आयपीसी 279, 304अ, 338 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicle Act) गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात 23 वर्षीय तरुणी जखमी झाली असून ती मूळची सांगली जिल्ह्यातील मिरज येथील आहे. (Pune Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, रामेश्वर आणि जखमी तरुणीचे प्रेमसंबंध होते. तरुणीचे पहिले लग्न झाले असून तिचे पतीसोबत पटत नसल्याने ती माहेरी राहत होती. दोघे आंतरधर्मीय विवाह करणार होते. मात्र, त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. तरुणीचे वडील वाहतूकदार असून शिंदे आणि तरुणीच्या वडिलांची ओळख होती. प्रेमविवाह करण्यासाठी रामेश्वर तरुणीला घेऊन मिरज येथून पसार झाला. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती.

पशुखाद्य असलेला आयशर कंपनीचा ट्रक घेऊन रामेश्वर आणि तरुणी शिंदवणे घाटातून रात्रीच्या सुमारास उरुळी कांचनकडे निघाले होते. घाटातील वळणावर रामेश्वरचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला.
अपघातात रामेश्वर गंभीर झाला तर तरुणी देखील जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख
(PSI Vishnu Deshmukh) हे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी जखमी झालेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केला. मात्र, रामेश्वर याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.
या अपघातात तरुणीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा
Mumbai-Pune Highway | मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करताय? मग जाणून घ्या ३ तासांच्या ब्लॉकदरम्यान पर्यायी मार्ग
ACB Trap News | 20 हजार रुपये लाच घेताना महापालिकेचा लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात