ACB Trap News | सरकारी अनुदानाच्या अनुकूल अहवालासाठी लाच घेणारे जाळ्यात; सीबीआयची कारवाई

नागपूर : ACB Trap News | खादी ग्रामोद्योगशी संबंधित एका खासगी फर्मच्या कर्मचाऱ्यांनी सरकारी अनुदानासाठी अनुकूल अहवाल देण्यासाठी लाच (Accepting Bribe) घेणाऱ्या एकाला सीबीआयने सापळा रचून पकडले. (ACB Trap News)

गोपी जांगीर आणि साहील ठाकूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

खादी ग्रामोद्योग Khadi Gram Udyog (केव्हीआयसी – KVIC) कडून जेनेसिस या संस्थेला केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत (Central Govt Scheme) अनुदान (Subsidy) मागणार्‍या युनिटसची तपासणी करुन अहवाल देण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या संस्थेकडून पीएमईजीपी अंतर्गत अनुदान मागणार्‍या विविध युनिटसची तपासणी करण्यात येते व त्यांनाच अहवाल द्यावा लागतो. या संस्थेत गोपी जांगीर व साहील ठाकूर काम करीत होते. भंडारा येथील एका कंपनीला अनुदानासाठी आवश्यक असणारा सकारात्मक अहवाल देण्यासाठी दोघांनी ४५ हजारांच्या लाचेची मागणी केली. पैसे दिले नाही तर नकारात्मक अहवाल देऊ अशी भितीही दाखविली होती. (ACB Trap News)

या कंपनीच्या वतीने सीबीआयच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Nagpur)
तक्रार करण्यात आली. प्राथमिक चौकशीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर तक्रारदाराकडून दिघोरी येथे १५ हजार रुपयांची लाच घेताना साहील ठाकूर याला रंगेहाथ पकडण्यात आले.
गोपी जांगीर पळून गेला असून त्याचा शोध सुरु आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

किरकोळ कारणावरून महिलेला शिवीगाळ करुन विनयभंग, दोन महिलांसह तिघांवर FIR; मुंढवा परिसरातील प्रकार

FIR On BJP MLA Sunil Kamble | सावरणार्‍याच्याच कानशिलात मारली; भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल