FIR On BJP MLA Sunil Kamble | सावरणार्‍याच्याच कानशिलात मारली; भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – FIR On BJP MLA Sunil Kamble | स्टेजवरुन उतरताना आमदार अडखळल्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी (Pune Police) त्यांना पडण्यापासून सावरले. त्याबद्दल धन्यवाद देण्याऐवजी आमदाराने त्या पोलिसांच्या कानशिलात मारली. आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जितेंद्र सातव (NCP Jitendra Satav) यांना मारहाण (Beating) केली होती. त्यानंतर पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकाराची शुक्रवारी दिवसभर चर्चा होती. रात्री उशिरा भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR On BJP MLA Sunil Kamble) दखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस अंमलदार शिवाजी सरक Police Officer Shivaji Sark (वय ३५) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) कार्यक्रमादरम्यान शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला. (MLA Sunil Kamble On FIR)

ससून रुग्णालयातील ११ मजली इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवाजी सरक यांना बंदोबस्तासाठी थांबविण्यात आले होते.
कार्यक्रम संपल्यानंतर आमदार सुनील कांबळे हे स्टेजवरुन खाली उतरत असताना त्यांचा पाय अडखळला.
ते पाहून फिर्यार्दी हे पुढे होऊन त्यांनी सावरले असताना सुनील कांबळे यांनी डाव्या हाताने त्यांच्या कानशिलात मारली.
फिर्यार्दी यांनी त्यांना पोलीस असल्याचे सांगितले असता त्यांनी फियार्दी यांना मग काय झाले असे मोठ्याने दरडावून
फिर्यार्दी यांना शासकीय कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार (PSI Sachin Pawar) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Mohol Murder Case | जमिनीच्या वादातून शरद मोहोळचा गेम;मोहोळच्या जवळच्या साथीदारांनी रचला कट, 8 जणांना अटक (व्हिडिओ)

Dr Dabholkar Murder Case | डॉ. दाभोलकर खून प्रकरण : दोन्ही आरोपींच्या बहिणींची एकच साक्ष, ”रक्षाबंधन असल्याने ते आमच्यासोबत होते”

Pune PMC Water Supply News | पुणे: शहराच्या ‘या’ भागाला एकवेळ पाणीपुरवठा

Sharad Mohol Dead In Firing | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍याचे नाव निष्पन्न, सोबत असलेल्यांनीच केला घातपात

Devendra Fadnavis On Sharad Mohol Murder | गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, ”टोळीयुद्ध होणार नाही, शासन बंदोबस्त करेल” (Video)

RPI Chief Ramdas Athawale | प्रकाश आंबेडकरांसाठी पक्षाचे अध्यक्षपद, केंद्रीय मंत्रीपद सोडण्यासाठी तयार,
आठवलेंची खुली ऑफर