ACB Trap News | आरोग्य निरीक्षक व पाणी पुरवठा अभियंता लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – नगर परिषद वणी (Yavatmal Nagar Parishad) येथील आरोग्य विभागातील (Health Department) घन कचरा संकलनाचे माहे जून महिन्याचे देयक काढून देण्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी करुन 20 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) वणी नगर परिषदेच्या आरोग्य निरीक्षकाला आणि पाणी पुरवठा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई गजानन भोजनालय, साई मंदिर चौक, यवतमाळ रोड वणी येथे केली आहे.

आरोग्य निरीक्षक जय अशोक उटवाल Health Inspector Jai Ashok Utwal (वय-44 रा.ह.मु डॉ. सिद्दीकी यांचे घरी साई नगरी वणी ता वणी जिल्हा यवतमाळ. मूळ पत्ता – नवल बाबा वार्ड पुसद. ता पुसद जि. यवतमाळ), पाणी पुरवठा अभियंता शुभम अनंतराव तायडे Water Supply Engineer Shubham Anantrao Taide (वय-26) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत वणी येथील 34 वर्षीय व्यक्तीने यवतमाळ एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे.

तक्रादर यांचे नगरपरिषद वणी येथील आरोग्य विभागातील घन कचरा संकलन (Solid Waste Collection) करण्याचे काम मुख्य कंत्राटदार दीपक उत्तरादी यांना मिळाले होते. त्यांनी घन कचरा संकलनाचे हे काम तक्रारदार यांना दिलेले आहे. घन कचरा संकलनाचे माहे जून महिन्याचे देयक काढून देण्याचा मोबदला म्हणून जय आकाश उटवाल यांनी 20 हजार रुपये व शुभम तायडे यांनी माहे एप्रिल, मे, जून या तीन महिन्याचे देयक काढून देण्याकरिता 60 हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी यवतमाळ एसीबीकडे दिली.

एसीबीच्या (Yavatmal ACB Trap News) पथकाने 26 जुलै रोजी पडताळणी केली असता आरोग्य निरीक्षक जय उटवाल व पाणी पुरवठा अभियंता शुभम तायडे यांनी लाचेची मागणी करुन लाच स्वीकारण्याचे मान्य केले. मंगळवारी (दि.1) एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये लाच घेतल्याने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर वणी पोलीस ठाण्यात (Vani Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे (Amravati Zone)
पोलीस अधीक्षक मारुती जगताप (SP Maruti Jagtap),
अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे (Addl SP Devidas Gheware),
यवतमाळ एसीबीचे पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे (DySP Uttam Namwade)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर (PI Vinayak Karegaonkar),
पोलीस निरीक्षक अमित वानखेडे (PI Amit Wankhede) पोलीस अमंलदार अतुल मत्ते,
अब्दुल वसीम , सुधीर कांबळे, राहुल गेडाम, सचिन भोयर, महेश वाकोडे,
राकेश सावसाकडे, सुरज मेश्राम आणि चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे,
सुधाकर कोकेवार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Sambhaji Bhide | संभाजी भिडेंची वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत – अजित पवार