ACB Trap News | लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यासह पंटर अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाकडून 600 रुपये लाच स्वीकारताना (Beed Bribe Case) बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील (Beed Gramin Police Station) पोलीस शिपाई व टपरी चालकाला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. पोलीस शिपाई अनिल कचरू घटमल Police Anil Kachru Ghatmal (वय-32 रा. पोलीस कॉलनी, बशीरगंज, बीड), टपरी चालक अनिकेत सुभाष कवडे (वय-23 रा. रामनगर ता. जि.बीड) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही कारवाई बुधवारी (दि.29) करण्यात आली. (ACB Trap News)

याबाबत 50 वर्षीय रिक्षा चालकाने बीड एसीबी (Beed ACB) कार्य़ालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार हे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय आहे. त्यांची स्वत:ची रिक्षा आहे. ते घोडका (ता. राजुरी) ते बीड शहर या रस्त्यावर त्यांच्या रिक्षामधून प्रवासी वाहतूक करतात. या रोडवर प्रवासी वाहतूक सुरळीतपणे करू देण्यासाठी व कोणतीही पोलीस कारवाई न करण्यासाठी प्रती महिना 300 रुपये प्रमाणे दोन महिन्याची 600 रुपये हप्त्याची रक्कम लाच म्हणून घटमल यांनी मागितली. याबाबत तक्रारदार यांनी बीड एसीबी कार्य़ालयात तक्रार केली. (ACB Trap News)

प्राप्त तक्रारीची 20 नोव्हेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी पोलीस शिपाई अनिल घटमल याने
तक्रारदार यांच्याकडे 600 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची रक्कम टपरी चालक
अनिकेत कवडे याच्याकडे देण्यास सांगितले. एसीबीच्या पथकाने बुधवारी सापळा रचला.
पोलीस शिपाई घटमल यांच्या सांगण्यावरून टपरी चालक कवडे याला तक्रारदार यांच्याकडून 600 रुपये लाच घेताना
रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यता घेतले असून त्यांच्यावर बीड शहर पोलीस ठाण्यात
(Beed City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक राजीव तळेकर (Addl SP Rajeev Talekar), बीड एसीबीचे पोलीस उपअधिक्षक
शंकर शिंदे (DySP Shankar Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड
(Police Inspector Gulab Bachewad), पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, खेत्रे, श्रीराम गिराम, भरत गारदे, कोरडे, खरसाडे,
अविनाश गवळी, चालक अंबादास पुरी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांची ठाकरे गटावर थेट टिका, म्हणाले – ”नालायकांनो आपला पक्ष सांभाळा, आता त्याच पद्धतीनं उत्तर देऊ”

Amit Shah On CAA | CAA आणणारच, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, अमित शाह यांच्या वक्तव्याने मोठ्या वादाची शक्यता